आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिकला आठवला 'तो' काळ:कार्तिक आर्यनच्या आईची कॅन्सरवर यशस्वी मात, अभिनेता म्हणाला- आई मला तुझा खूप अभिमान आहे

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कार्तिकने इव्हेंटमध्ये सर्वांना म्हटले रिअल हीरोज

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने खुलासा केला की, त्याच्या आईला काही वर्षांपूर्वी कॅन्सरचे निदान झाले होते, पण आता या आजारावर आईने मात केली आहे. मुंबईतील एका रुग्णालयाने राष्ट्रीय कर्करोग जनजागृती महिन्यानिमित्त कर्करोग जनजागृती मोहीम आयोजित केली होती. या कार्यक्रमाला कार्तिक आणि त्याच्या आईने हजेरी लावली होती. यावेळी कार्तिकने सांगितले की, त्याच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. पण आता त्याच्या आईने यावर यशस्वी मात केली आहे.

कार्तिकची आई माला तिवारी यांना चार वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते, मात्र उपचाराने त्या आता पूर्णपणे ब-या झाल्या आहेत.

कार्तिकच्या आईची कॅन्सरवर मात
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये कार्तिकने लिहिले की, 'या गाण्याच्या शूटिंगदरम्यान किमोथेरपी सेशनला जाण्यापासून ते स्टेजवर डान्स करण्यापर्यंतचा प्रवास खडतर होता. पण हे सर्व असूनही तिची सकारात्मकता, चिकाटी आणि निर्भयपणाने आम्हाला पुढे जाण्यास मदत केली.'

'आज मी अभिमानाने सांगू शकतो की माझ्या आईने कर्करोगाशी लढा दिला आणि त्यावर विजय मिळवला. मला तुझा खूप अभिमान आहे आई.'

कार्तिकने इव्हेंटमध्ये सर्वांना म्हटले रिअल हीरोज
या कार्यक्रमात बोलताना कार्तिक म्हणाला, "आमच्या सर्वांसाठी हा खूप भावनिक काळ होता. मला माझ्या आईचा अभिमान आहे की ती या आजाराशी लढा जिंकू शकली. या आजाराशी लढा देणारे तुम्ही सगळे खरे हीरो आहात.

हा बरा होऊ शकत नाही असा आजार नाही. आज आपल्याकडे अनेक सुविधा आहेत, ज्याद्वारे आपल्याला त्याची माहिती मिळते. आपल्या सर्वांसाठी नियमित तपासणीसाठी जाणे खूप महत्वाचे आहे. जर एखाद्याला कॅन्सर झाला असेल, तर याद्वारे तो त्याला सुरुवातीच्या टप्प्यात ओळखू शकतो. कमीत कमी तुम्ही अशा टप्प्यावर जाण्याचे टाळाल जे घातक ठरू शकते. योग्य औषधोपचारांनी तुम्ही यावर मात करु शकता."

बातम्या आणखी आहेत...