आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिक आर्यनच्या नव्या चित्रपटाची घोषणा:सत्य घटनेवर आधारित 'कॅप्टन इंडिया'मध्ये कार्तिक बनणार पायलट, हंसल मेहता करणार दिग्दर्शन

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरएसवीपी आणि बावेजा स्टुडिओजचा नवा चित्रपट 'कॅप्टन इंडिया'

आरएसवीपी आणि बावेजा स्टुडिओज त्यांच्या आगामी 'कॅप्टन इंडिया' या चित्रपटाद्वारे इतिहासातील सर्वात यशस्वी बचाव मोहिमांमधील एक मोहिम पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचे कथानक सत्य घटनेने प्रेरित असून भारताच्या सर्वात मोठ्या आणि यशस्वी बचाव मोहिमेवर आधारित आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला व हरमन बावेजा यांची निर्मित असलेला हा चित्रपट एक्शन-ड्रामा असून यात कार्तिक आर्यन एका शूर आणि साहसी पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.

याविषयी बोलताना कार्तिक आर्यन म्हणाला, ”कॅप्टन इंडिया' एकाच वेळी प्रेरणादायक आणि रोमांचकारी चित्रपट आहे आणि त्याच्यासोबत मला आपल्या देशाच्या अशा एका ऐतिहासिक अध्यायाचा भाग बनता आले, हा माझा सन्मान असून याचा मला अभिमान आहे. हंसल सरांच्या कामाप्रता माझ्या मनात खूप आदर असून त्यांच्यासोबत काम करण्यासाठीची ही योग्य संधी आहे.”

दिग्दर्शक हंसल मेहता म्हणतात, "कॅप्टन इंडिया सत्य घटनेपासून प्रेरित असून एका अशा घटनेला चित्रित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपले दुःख आणि वेदना बाजूला सारून हजारों लोकांचे प्राण वाचवतो. मला या चित्रपटासाठी रॉनी स्क्रूवाला आणि हरमन बावेजा यांच्यासोबत काम करण्याचा आनंद आहे आणि मी कार्तिकसोबत काम करण्यासाठी उत्साहित आहे."

रोनी स्क्रूवाला आणि हरमन बावेजा यांची निर्मिती, बावेजा स्टुडिओजचे विक्की बाहरी यांची सह-निर्मिती असलेल्या या चित्रपटामध्ये आरएसवीपीतर्फे सोनिया कंवर एसोसिएट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. 'कॅप्टन इंडिया'चे चित्रीकरण पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला सुरू होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...