आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंग अपडेट:‘भूल भुलैय्या 2’च्या उर्वरित भागांचे चित्रीकरण एकाच टप्प्यात होणार पूर्ण, बायो-बबलमध्ये होईल शूटिंग; परिस्थिती सामान्य झाल्यानंतर चित्रपटगृहांतच प्रदर्शित होईल चित्रपट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे

कार्तिक आर्यन अभिनीत ‘भूल भुलैय्या 2’चे चित्रीकरण आता एकाच टप्प्यात पूर्ण करण्याची योजना तयार केली जात आहे. टी-सीरीजच्या अधिकाऱ्यांसह दिग्दर्शक अनीस बज्मी यांनीही याला दुजोरा दिला आहे. सोबतच कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सामान्य झाल्यानंतर चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे

अनीस बज्मी म्हणाले, विविध कारणांमुळे एक वर्षापासून चित्रीकरण रखडले आहे. गेल्यावर्षीच्या सुरुवातीला लखनऊमधून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होत. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाला आणि चित्रीकरण थांबवावे लागले. बरोबर एक वर्षानंतर मार्चमध्ये मनाली आणि मुंबईत चित्रीकरण सुरू करण्यात आले. मात्र कार्तिकला कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुंबईत पुन्हा लॉकडाऊन झाले.आता प्रशासनाने बायो बबलमध्ये चित्रीकरण करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे रात्रीपर्यंत खुले आणि नंतर इनडोअर चित्रीकरण करणार आहोत. येत्या काही दिवसांत चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेबाबत आम्ही घोषणा करणार आहोत. उर्वरित भागांचे चित्रीकरण एकाच टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे.

या हॉरर कॉमेडी चित्रपटात कार्तिकशिवाय किआरा आडवाणी, तब्बू आणि राजपाल यादव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट भूषण कुमार, मुराद आणि कृष्ण कुमार यांची निर्मिती आहे. हा चित्रपट अक्षय कुमार स्टारर भुल भुलैय्याचा रिमेक आहे. हा चित्रपट 2007 मध्ये आला होता. मात्र कार्तिकच्या चित्रपटाची कहाणी या चित्रपटापेक्षा पूर्वी वेगळी असेल.

बातम्या आणखी आहेत...