आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘भूल भुलैया 2’ चित्रपटाला गेल्या काही दिवसांपासून उशीर हाेत चालला आहे. गेल्या वर्षी सुरू झालेले या चित्रपटाचे शूटिंग मार्चमध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर थांबवण्यात आले होते. त्यानंतर या वर्षी 24 फेब्रुवारीला मनाली आणि त्यानंतर मुंबईत चित्रपटाचा दुसरा भाग सुरू करण्यात आले. त्यानंतर चित्रपटातील मुख्य अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोना झाला. तेव्हापासून आतापर्यंत याचे शूटिंग रखडले आहे. आता कार्तिक कोरोनाने बरा झाला आहे तरी तो आणि इतर कलाकार शूटिंगला जाऊ शकत नाहीत. कारण आता याचे शूटिंग मे-जूनमध्येच सुरू होऊ शकेल. कारण मुुंबईत कोरोनामुळे बरेच बंधन घालण्यात आले आहेत.
चित्रपटाचा कला दिग्दर्शक रजत पोद्दारने या बातमीला दुजोरा देत म्हटले की, सध्या तरी याचे शूटिंग होणार नाही. आम्ही मे किंवा जूननंतर याचे शूटिंग सुरू करू. आम्हाला याचे कारण सांगण्यात आले नाही, मात्र मुंबईत सेट उभारण्याचे काम होते ते थांबवण्यात आले आहे. आतापर्यंत फक्त 40 टक्केच शूटिंग झाले आहे.
‘दिव्य मराठी’ने या विषयी जेव्हा दिग्दर्शक अनीस बज्मी यांना विचारले तर ते म्हणाले, परिस्थिती सामान्य असती तर आम्ही आधी मुंबईत आणि नंतर लखनऊमध्ये जाऊन शूट करणार होतो. मात्र आता परिस्थिती खूपच वाईट आहे. सेटवरदेखील खूपच बंधन आहेत. सध्या तर कार्तिक बरा झाला आहे, मात्र अजूनही आमचे पाच क्रू मेंबर्स पाॅझिटिव्ह आहेत. मुख्य कलाकारांपैकी फक्त किआरा आडवाणी आणि तब्बू निगेटिव्ह आहेत. मीदेखील सावधगिरी म्हणून लस घेतली आहे. निर्मात्यांसोबत आम्ही तीन दिवस बैठक करणार आहोत. त्यात शूटिंग कधी सुरू होणार ते ठरवणार आहे.
दुसरीकडे 'भूल भुलैया’ मधील मुख्य हीरो अक्षय कुमारसोबत कार्तिक आर्यनची होत असलेल्या तुलनेवर अनीस म्हणाले, 'अक्षयसोबत कार्तिकची तुलना करणे निरर्थक आहे. अक्षय खूप सीनियर आहे. त्याने बरेच चित्रपट केलेत. कार्तिक इंडस्ट्रीत येऊन चार पाच वर्षे झाली आहेत. प्रेक्षकदेखील चित्रपटाच्या सुरुवातील पाच ते दहा मिनिट कार्तिकमध्ये अक्षयला शोधणार, मात्र कथा पुढे जाईल तशी त्यांना कथा आणि सेटप नवीन दिसेल त्यामुळे तुलना होणार नाही.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.