आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिक आर्यनने आईवडिलांसोबत साजरा केला बर्थडे:फोटो शेअर करत म्हणाला- प्रत्येक जन्मात मला तुमचा कोकी म्हणून जन्म घ्यायला आवडेल

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आज (22 नोव्हेंबर) त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास निमित्ताने त्याच्या आईवडिलांनी काल रात्री त्याला सरप्राईज दिले. या सेलिब्रेशनचे काही फोटो कार्तिकने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याची रुम फुग्यांनी सजलेली दिसत असून टेबलवर 'हॅपी बर्थडे कोकी' असे लिहिलेला केक ठेवला आहे. यासोबतच एका मुलाखतीत कार्तिकने त्याच्यासाठी वाढदिवस म्हणजे काय ते सांगितले आहे.

या सरप्राइजसाठी आई आणि वडिलांचे मानले आभार
सेलिब्रेशनचे हे फोटो शेअर करत कार्तिकने लिहिले, 'प्रत्येक जन्मात मला तुमचा कोकी म्हणून जन्म घ्यायला आवडेल.. वाढदिवसाच्या या सुंदर सरप्राईजसाठी आई-पप्पा, कटोरी आणि किकीचे आभार.'

क्रिती देणार कार्तिकला बेस्ट गिफ्ट
हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण कार्तिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. कमेंट करताना अभिनेत्री क्रिती सेननने लिहिले, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बंटू माझ्याकडे तुझ्यासाठी बेस्ट गिफ्ट आहे... स्टे ट्यून्ड!' क्रितीची ही कमेंट पाहिल्यानंतर तिने कार्तिकसाठी सरप्राईज प्लॅन केल्याचा अंदाज फॅन्स लावत आहेत. दुसरीकडे, 'शेहजादा'च्या निर्मात्यांनी कार्तिकच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. क्रिती आणि कार्तिक आगामी 'शेहजादा'मध्ये एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्याचबरोबर आयुष्मान खुराणा, रकुल प्रीत सिंग, फराह खान, मनीष मल्होत्रा ​​यांनीही कार्तिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाढदिवस हा आनंद आहे
ईटाइम्ससोबत आपल्या वाढदिवसाविषयी बोलताना कार्तिक म्हणाला, 'वाढदिवस हा आनंद आहे. विशेषत: अशा चाहत्यांसह जे तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात आणि तुमच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करतात. हे हृदयाला भिडते.' यासोबतच तो पुढे म्हणाला, 'माझ्या वाढदिवशी आई घरी सत्यनारायणाची पूजा ठेवते. याशिवाय ती माझ्या आवडीचे पदार्थ बनवते.'

आयुष्य लहान आहे त्यामुळे तुम्ही जे काही करता त्याचा आनंद घ्या
तरुण पिढीला संदेश देत कार्तिक आर्यन म्हणाला, 'नेहमी स्वप्न पहा आणि मग ते मोठे असो वा लहान, पण स्वप्न नक्कीच पहा. परिश्रम, समर्पण आणि घाम गाळून स्वप्ने नेहमीच साकार होतात. कधीही हार मानू नका आणि तुमची स्वप्ने साध्य करण्याच्या मार्गात येणाऱ्या संघर्षांबद्दल कधीही तक्रार करू नका. आयुष्य खूप लहान आहे, त्यामुळे तुम्ही जे काही करता त्याचा आनंद घ्या आणि नेहमी हसत राहा.'

कार्तिक आर्यनचे आगामी प्रोजेक्ट्स
कार्तिक आर्यनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच 'फ्रेडी' या चित्रपटात दिसणार आहे. शशांक घोष दिग्दर्शित 'फ्रेडी' या थ्रिलर चित्रपटात आलिया एफ कार्तिकसोबत दिसणार आहे. याशिवाय तो 'सत्यप्रेम की कथा', 'आशिकी 3', 'शहजादा' आणि 'कॅप्टन इंडिया' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...