आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडिया ड्रामा:अफेअरच्या बातम्या चर्चेत असताना कार्तिक-जान्हवीने इन्स्टाग्रामवर एकमेकांना केले अनफॉलो, बातमी व्हायरल होताच पुन्हा केले फॉलो

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इन्स्टाग्रामवर कार्तिक-जान्हवीने एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाऊ लागले.

अभिनेता कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. मात्र असे असतानाच या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉवो केले, पण दुस-याच क्षणी ही बातमी व्हायरल होताच दोघांनी पुन्हा एकमेकांना फॉलो देखील केले आहे. अलीकडेच कार्तिक आणि जान्हवी न्यू इयर सेलिब्रेशनसाठी एकत्र गोव्यात गेले होते. दोघांचेही तेव्हाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तेव्हापासून हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. यापूर्वीही या दोघांनाही बर्‍याचदा एकत्र पाहिले गेले आहे. इन्स्टाग्रामवर कार्तिक-जान्हवीने एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाऊ लागले. मात्र दोघांनीही एकमेकांना अनफॉलो का केले होते, याविषयीची माहिती समोर आलेली नाही.

आर्यन-जान्हवीच्या चित्रपटाचे शूटिंगही पुढे ढकलले गेले
दोस्ताना 2 या चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आल्यानंतर कार्तिक आणि जान्हवी यांनी एकमेकांना अनफॉलो केल्याचे वृत्त समोर आले होते. चित्रपटाच्या शूटिंगसाठी संपूर्ण टीम लंडनला जाणार होती. पण पुन्हा एकदा तिथे कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.

या दोघांचा सोबतचा पहिला चित्रपट

'दोस्ताना 2' हा कार्तिक आणि जान्हवीचा एकत्र असलेला पहिला चित्रपट आहे. जर कार्तिक आणि जान्हवी यांच्यात काही वाद झाला असेल तर त्याचा नक्कीच चित्रपटावर परिणाम होईल. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहेत. याच चित्रपटातून लक्ष्यचे बॉलिवूड डेब्यू होणार आहे.

कार्तिक 'धमाका'च्या शूटिंगमध्ये बिझी
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, कार्तिक सध्या त्याच्या आगामी धमाका या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय कार्तिक 'भूल भूलैया 2' मध्येही दिसणार आहे. 'भूल भूलैया 2' मध्ये कार्तिकशिवाय कियारा अडवाणीही मुख्य भूमिकेत आहे. जान्हवीबद्दल बोलायचे झाल्यास ती सध्या तिच्या आगामी ‘गुड लक जेरी’ चित्रपटाचे शुटिंग करत आहे. याशिवाय राजकुमार रावसोबत ती ‘रुही अफसाना’ चित्रपटातही दिसणार आहे.