आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सत्यनारायण की कथा'चे शीर्षक बदलले:वादानंतर चित्रपटाचे शीर्षक झाले 'सत्यप्रेम की कथा', फर्स्ट लूक फोटो आला समोर

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या वर्षी शीर्षकावरुन निर्माण झाला होता वाद

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या आगामी 'सत्यनारायण की कथा' या चित्रपटाचे शीर्षक बदलण्यात आले आहे. कियाराच्या वाढदिवसानिमित्त कार्तिकने चित्रपटातील फर्स्ट लूक मोशन फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच चित्रपटाचे शीर्षक 'सत्यनारायण की कथा' वरून बदलून 'सत्यप्रेम की कथा' करण्यात आल्याचे कार्तिकने सांगितले आहे.

गेल्या वर्षी शीर्षकावरुन निर्माण झाला होता वाद
कोणताही वाद होऊ नये म्हणून निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा होताच त्याच्या शीर्षकावरून वाद सुरू झाला होता. अनेकांनी त्याला हिंदुत्वविरोधी म्हटले होता. त्यानंतर निर्मात्यांनी आम्ही चित्रपटाचे शीर्षक बदलू, कारण आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत, असे म्हटले होते.

कार्तिकने शेअर केला फर्स्ट लूक फोटो
कार्तिक आर्यनने या लव्ह स्टोरी चित्रपटातील कियारासोबतचा फर्स्ट लूक मोशन फोटो शेअर केला आणि लिहिले, "हॅपी बर्थडे कथा. तुझा सत्यप्रेम. #satyapremKiKatha." या फोटोमध्ये दोघे एकमेकांना मिठी मारताना खूप रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

रोमँटिक अंदाजात दिसले कार्तिक-कियारा
फोटोमध्ये कार्तिक ग्रे टी शर्टसह ब्लॅक जॅकेटमध्ये तर कियारा व्हाइट टॉपमध्ये दिसतेय. फोटोसोबतच बॅकग्राउंडमध्ये चित्रपटाचे रोमँटिक संगीतही वाजत आहे. या फोटोवर कमेंट करून चाहते कार्तिक-कियारावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. यासोबत कियाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. एक दिवस आधी म्हणजेच 31 जुलै रोजी कियाराने तिचा 30 वा वाढदिवस साजरा केला आहे.

कार्तिक-कियारा दुसऱ्यांदा एकत्र दिसणार आहेत
समीर विध्वंस यांनी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या दिग्दर्शिनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. या चित्रपटात कार्तिक-कियारा दुसऱ्यांदा एकत्र दिसणार आहेत. याआधी 20 मे रोजी रिलीज झालेल्या 'भूल भुलैया 2'मध्ये दोघेही पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसले होते. 'भूल भुलैया 2' हा 2022 मधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी बॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 265 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता.

बातम्या आणखी आहेत...