आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता कार्तिक आर्यन सध्या आपल्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात बिजी असून सोबतच तो नवीन प्रोजेक्टची घोषणा देखील करत आहेत. नुकतीच त्याने त्याच्या आगामी शहजादा या चित्रपटाची घोषणा केली आहे. 12 ऑक्टोबरपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणादेखील सुरुवात झाली होती. मुंबईत चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. हा चित्रपट रोहित धवन दिग्दर्शित करत आहे. तो अभिनेता वरुण धवनचा मोठा भाऊ आहे. या चित्रपटात कार्तिक त्याची 'लुका छुपी'ची सह-कलाकार कृती सेननसोबत दिसणार आहे.
दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक
हा चित्रपट साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन 'अला वैकुंठपुरमुलु' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. यात अल्लूसह पूजा हेगडे मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाला प्रेक्षरांसह समीक्षकांची दाद मिळाली होती. कार्तिकने काही दिवसांपूर्वीच 'अला वैकुंठपुरमुलु'मधील गाणे 'बुट्टा बोम्मा'वर एक डान्स व्हिडीओ शेअर केला होता आणि आता 'शहजादा'च्या घोषणेने चाहत्यांचा उत्साह वाढवला आहे.
चित्रपटात मनीषा कोइराला आणि परेश रावल, रोनित रॉय, सचिन खेडेकर हे देखील सहायक भूमिकेत असणार आहेत. आपले टाइटल, टॅग लाइन, कार्तिक आर्यन यांच्यामुळे हा रिमेक दमदार होणार आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 पडद्यावर येईल.
कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे शहजादासह तो 'धमाका', 'भूल भुलैया 2', 'फ्रेडी' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. याशिवाय त्याच्याकडे एकता कपूरचा यू टर्न, अनुराग कश्यपचा अद्याप शीर्षक न ठरलेला चित्रपटदेखील आहे. यात तो अलाया एफसह स्क्रिन शेअर करणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.