आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Kartik Aaryan, Ayushmann Khurrana And Sidharth Malhotra Had Turned Down 'Hungama 2', Director Priyadarshan Said 'Maybe They Find Me Outdated'

दिग्दर्शकाची नाराजी:प्रियदर्शनने आधी कार्तिक, आयुष्मान आणि सिद्धार्थला ऑफर केला होता 'हंगामा 2', तिघांनीही दिला होता नकार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट 23 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

प्रियदर्शन दिग्दर्शित हंगामा 2 हा चित्रपट येत्या 23 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज होणार आहे. मीजान जाफरी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता मीजानच्या आधी या चित्रपटाची ऑफर कार्तिक आर्यन, आयुष्मान खुराना आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना देण्यात आली होती. मात्र या तिन्ही अभिनेत्यांनी या चित्रपटाची ऑफर नाकारली. त्यानंतर मीजानला कास्ट करण्यात आले.

याविषयी प्रियदर्शन म्हणाले, दक्षिणेत मला कोणीच नकार देत नाही. कारण त्यांना माझ्याबद्दल बरंच माहित आहे. पण कदाचित नवीन मुलांना माझ्या विषयी काही माहिती नाही. त्यांना नव्या दिग्दर्शकासोबत काम करण्यास सोयीस्कर वाटत असेल आणि मी जुन्या विचारांचा माणूस आहे.

काही दिवसांपूर्वीच 'हंगामा 2' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि तो लोकांच्या पसंतीसही पडत आहे. ‘हंगामा 2’च्या 3 मिनिटांच्या ट्रेलरच्या सुरुवातीला एक मुलगी लहान बाळा घेऊन बसलेली दिसत आहे. हे बाळ मिजानचे असल्याचे ती म्हणत असते. दरम्यान मिजान आणि शिल्पा खरे शोधत असतात. पण मिजान आणि शिल्पाचे एकत्र फिरणे पाहून परेश रावल यांना पत्नी शिल्पा शेट्टीचे अफेअर सुरु आहे असे वाटते. त्यामुळे ‘हंगामा 1’ प्रमाणेच ‘हंगामा 2’मध्येही परेश रावल यांचा गोंधळ पाहायला मिळणार.

‘हंगामा 2’ या चित्रपटात शिल्पा आणि परेश रावल यांच्यासोबत राजपाल यादव, मिजान जाफरी, प्रणिता हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून शिल्पा शेट्टीने कमबॅक केला आहे. 2003 मध्ये प्रदर्शित झालेला ‘हंगामा’ हा चित्रपट बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक आहे. आजही प्रेक्षक तो चित्रपट आवडीने पाहतात. या चित्रपटात परेश रावल, सोमा आनंद, अक्षय खन्ना, रिमी सेन आणि अफताब शिवदसानी मुख्य भूमिकेत होते.

बातम्या आणखी आहेत...