आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग:बॉडीगार्ड सचिनच्या लग्नात पोहोचला कार्तिक आर्यन, कपलसोबत काढले फोटो; चाहते म्हणाले- आता तुझ्या लग्नाची वाट पाहतोय

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता कार्तिक आर्यनचा बॉडीगार्ड सचिन नुकताच विवाहबंधनात अडकला. यावेळी कार्तिकने केवळ लग्नाला हजेरी लावली नाही तर नवविवाहित जोडप्यासोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्याने नवविवाहित दाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये कार्तिक कपलसोबत पोज देताना दिसत आहे. कार्तिकचे चाहते त्याच्या या साधेपणाचे खूप कौतुक करत आहेत.

कार्तिकसोबत बॉडीगार्ड सचिन आणि त्याची पत्नी सुरेखासोबत.
कार्तिकसोबत बॉडीगार्ड सचिन आणि त्याची पत्नी सुरेखासोबत.

लग्नात कॅज्युअल लूकमध्ये पोहोचला, कपलसोबत काढले फोटो
फोटो पोस्ट करत कार्तिकने लिहिले, 'सचिन आणि सुरेखा, भावी आयुष्यासाठी तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखात जावो.' कार्तिकने लग्नाचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये कार्तिक अनेक लोकांसोबत पोज देताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये कार्तिक नवविवाहित जोडपे सुरेखा-सचिनसोबत सेल्फी काढताना दिसतोय. यावेळी कार्तिकने लाइट यलो आणि ब्लू डेनिममध्ये अतिशय सिंपल लूकमध्ये दिसला.

कार्तिक आर्यन त्याच्या टीमसोबत पोज देताना दिसतोय.
कार्तिक आर्यन त्याच्या टीमसोबत पोज देताना दिसतोय.

चाहते म्हणाले- कार्तिक तुझ्या लग्नाची वाट पाहत आहोत
कार्तिकच्या या पोस्टवर त्याचे चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कार्तिक लग्नात कॅज्युअल कपडे का घालतो, असा प्रश्न एका चाहत्याने विचारला आहे. तर एकाने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले - 'कार्तिक आता तुझ्या लग्नाची वाट पाहत आहे.'

कार्तिकचे चित्रपट
कार्तिक लवकरच 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. याशिवाय 'आशिकी 3'साठी अभिनेत्याला साईन करण्यात आले आहे. मात्र अद्याप अभिनेत्रीचे नाव निश्चित झालेले नाही.

सारा आणि क्रितीसोबत जोडले गेले आहे कार्तिकचे नाव
कार्तिकचे नाव अभिनेत्री सारा अली खान, अनन्या पांडे आणि क्रिती सेननसोबत जोडले गेले आहे. मात्र 2020 मध्ये त्याचे सारासोबत ब्रेकअप झाले. सारानंतर त्याचे नाव अनेकदा क्रितीसोबत जोडले गेले. मात्र कार्तिक स्वत:ला सिंगल असल्याचे सांगतो.