आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिक रोशनच्या बहिणीला डेट करतोय कार्तिक आर्यन?:एकमेकांच्या घरी एकत्र वेळ घालवतात, दिवाळीही सोबत साजरी केली

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आता अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशनला डेट करत आहे. दोघे एकमेकांच्या घरी भेटत असतात. पिंकव्हिलाने केलेल्या दाव्यानुसार, जेव्हा कार्तिक कामात बिझी नसतो, तेव्हा तो पश्मिनाच्या घरी तिला भेटायला जातो. काही वेळा पश्मिना कार्तिकच्या भेटीसाठी त्याच्या घरी येत असते.

दिवाळीतही कार्तिकने पश्मिनासोबत वेळ घालवला
पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, दिवाळीमध्ये कार्तिक-पश्मिना त्याच्या नव्याकोऱ्या मॅक्लेरन कारमधून बाहेर फिरायला गेले होते. जिओ वर्ल्ड ड्राईव्ह हे त्यांचे भेटण्याचे आवडते ठिकाण आहे

कार्तिकच्या जवळच्या व्यक्तीने पिंकव्हिलाला सांगितल्यानुसार, ‘जेव्हा कार्तिक कामात नसतो, तेव्हा तो पश्मिनाच्या घरी तिला भेटायला जातो. काही वेळेस ती कार्तिकची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी जाते. ते गपचुप भेटले आहेत हे लोकांना कळू नये म्हणून ते आपापल्या गाड्या घरी पाठवून देतात, जेणेकरुन कोणाला त्यांच्यावर संशय येणार नाही.’

'इश्क विश्क रिबाउंड'मधून पदार्पण करणार आहे पश्मिना

पश्मिना रोशन ही दिग्दर्शक राजेश रोशन यांची मुलगी आणि अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण आहे. पश्मिना हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याची तयारी करत आहे. ती लवकरच 'इश्क विश्क'चा सिक्वेल 'इश्क विश्क रिबाउंड'मध्ये दिसणार आहे. पश्मिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कार्तिक आर्यन देखील तिच्या फॉलोअर्सपैकी एक आहे.

कार्तिक पश्मिनापूर्वी साराला डेट करत होता कार्तिक
यापूर्वी कार्तिक आर्यनच्या 'लव्ह आज कल'मधील त्याची को-स्टार सारा अली खानला डेट करत होता. खरं तर, काही वर्षांपूर्वी 'कॉफी विथ करण'मध्ये साराने तिचे वडील सैफ अली खान यांच्यासमोर कार्तिकवर क्रश असल्याचे सांगितले होते. यासोबतच साराने कार्तिकला डेट करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. जेव्हा दोघांनी 'लव्ह आज कल 2' मध्ये एकत्र काम केले तेव्हा त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना उधाण आले होते. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. कार्तिकने साराला इंस्टाग्रामवर अनफॉलोही केल्याची बातमी आली होती.

बातम्या आणखी आहेत...