आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदाची बातमी:अभिनेता कार्तिक आर्यनच्या आईची कर्करोगावर यशस्वी मात, अभिनेता म्हणाला - 'आम्ही अंधारावर विजय मिळवला'

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यनच्या सोशल मीडियावर एक इमोशन पोस्ट शेअर केली आहे. कार्तिकची आई माला तिवारी या गेल्या काही दिवसांपासून ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होत्या. आता त्यांनी कॅन्सरवर मात केली आहे. कार्तिक आर्यनने नुकताच आईसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.

कार्तिक म्हणाला, आम्ही अंधारावर विजय मिळवला
कार्तिक आर्यनने इन्स्टाग्रामवर आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, 'काही काळापूर्वी बिग सी - 'कॅन्सर' आमच्या आयुष्यात आला आणि त्याने आमच्या कौटुंबिक जीवनात नासधूस करण्याचा प्रयत्न केला! आम्ही हतबल होतो! पण माझ्या आईने एका निडर सैनिकाप्रमाणे त्याचा सामना केला. तिने जिद्दीने कधीही हार मानली नाही. आम्ही अंधारावर विजय मिळवला. तुमच्या कुटुंबाच्या प्रेम आणि पाठिंब्यापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नसते!,' असे कार्तिक म्हणाला आहे.

कार्तिकच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
कार्तिकच्या या पोस्टवर कपिल शर्मा, टायगर श्रॉफ, मौनी रॉय, सोनल चौहान, मनीष मल्होत्रा, विकी कौशल, कपिल शर्मा, आयुष्मान खुराणा, सान्या मल्होत्रा, एकता कपूरसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केली आहे. अनुपम खेर यांनी, 'जय माता दी' अशी कमेंट केली आहे.

कार्तिकचे आगामी चित्रपट
कार्तिक आर्यनने 'सोनू के टीटू की स्वीटी', 'प्यार का पंचनामा 2', 'भूल भुलैया 2', 'पति पत्नी और वो', 'धमाका' यांसह अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केले आहे. त्याच्या कामाला प्रेक्षकांनी पसंतीची पावतीही दिली. अलीकडेच कार्तिकचा 'शहजादा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता प्रेक्षक आर्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटांची वाट बघत आहेत. 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात कार्तिक कियारा अडवाणीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.