आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे कार्तिक आर्यन:इंजिनीअरिंगचे क्लास बंक करुन द्यायचा फिल्म ऑडिशन्स, पहिली कार होती थर्ड हँड

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये गॉडफादरशिवाय स्टार बनलेल्या कलाकारांच्या यादीत कार्तिक आर्यनच्या नावाचा समावेश आहे. अभियांत्रिकी अर्धवट सोडून कार्तिकने स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज कार्तिक 32 वर्षांचा झाला आहे. तो एकेकाळी मिड आणि लो बजेट चित्रपटांचा नायक होता, पण 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटानंतर तो ए-लिस्टर अभिनेता बनला आहे.

आता कार्तिक मोठा स्टार बनला आहे. पण त्याची ही सुरुवात एवढी सोपी नव्हती. कार्तिकने अभियंता व्हावे अशी त्याच्या आईवडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्याने इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. याच दरम्यान त्याच्या मनात हिरो बनण्याची इच्छा निर्माण झाली आणि तो इंजिनीअरिंगचे वर्ग बंक करून चित्रपटांच्या ऑडिशनला जायचा. बराच काळ संघर्ष केला, त्यानंतर त्याला ‘प्यार का पंचनामा’ हा पहिला चित्रपट मिळाला. पहिला चित्रपट हिट ठरला होता, पण तरीही कार्तिककडे स्वतःची नवीन कार घेण्याइतके पैसे नव्हते. म्हणून त्याने थर्ड हँड कार विकत घेतली. कमी बजेटचा चित्रपट आणि थर्ड हँड कारने सुरू झालेला कार्तिकचा चित्रपट प्रवास आज एका चित्रपटासाठी 35-40 कोटींपर्यंत पोहोचला आहे. आता कार्तिक 4.5 कोटींच्या लेम्बोर्निगीमधून फिरतो.

कार्तिक आर्यनच्या 32 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊया, त्याचा आतापर्यंतचा चित्रपट प्रवास कसा राहिला...

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना चित्रपटांसाठी ऑडिशन देत असे
कार्तिकला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे होते. याच कारणामुळे कॉलेजमध्ये शिकत असताना तो क्लास अर्धवट सोडून चित्रपटांच्या ऑडिशनला जायचा. कार्तिकने आपल्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात कॉलेजच्या काळात केली होती. कार्तिक जिथे जिथे ऑडिशनला गेला तिथे त्याला नकाराला सामोरे जावे लागले. ऑडिशनमध्ये सतत अपयशी ठरल्यानंतर त्याने अभिनयाचा कोर्सही केला.

कार्तिक कॉलेजच्या तिसर्‍या वर्षाला असताना त्याला पहिला चित्रपट ब्रेक मिळाला. कार्तिकने आपल्या करिअरची सुरुवात 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून केली. हा चित्रपट साईन केल्यावरच त्याने आपल्या आईवडिलांना पहिला चित्रपट मिळाल्याची माहिती दिली होती.

कार्तिकला पहिल्या चित्रपटासाठी 1.25 लाख रुपये मिळाले होते. 10 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 17 कोटींची कमाई केली होती.

11 वर्षांच्या करिअरमध्ये 12 चित्रपटांमध्ये केले काम
कार्तिकच्या करिअरचा आलेख पाहता त्याने आतापर्यंत 12 चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यामध्ये एक शॉर्ट फिल्म आणि 'धमाका' हा चित्रपट आहे, जो ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. उर्वरित 10 चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले.

कार्तिक 46 कोटींचा मालक आहे
कार्तिक आता एका चित्रपटासाठी 35 ते 40 कोटी रुपये घेतो. तो दरमहा 50 लाख रुपयांपर्यंत कमावतो. 'भूल भुलैया 2' या चित्रपटाच्या यशानंतर त्याची संपत्ती वाढली. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कार्तिक एका चित्रपटासाठी 15 ते 16 कोटी रुपये घेत असे.

पहिली गाडी होती थर्ड हँड
कार्तिकच्या पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले होते, मात्र त्यावेळी रेड कार्पेट इव्हेंटमध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे स्वतःची कार नव्हती. होय, कार्तिकने एका मुलाखतीत सांगितले होते की, पहिल्या 2 चित्रपटांनंतर त्याने 60,000 रुपये किंमतीची कार खरेदी केली होती. त्या कारच्या डोअरमध्ये अडचण होती, तरीही त्याने ती कार विकत घेतली होती. कारण रेड कार्पेट इव्हेंटमध्ये कार्तिकला ऑटो, बाईकने जावे लागत होते किंवा कुणाकडून तरी लिफ्ट घ्यावी लागत होती.

एककाळ असा होता, जेव्हा कार्तिक आर्यनला लोकांकडून लिफ्ट मागून किंवा थर्ड हँड कारने कोणत्याही कार्यक्रमाला जावे लागायचे, मात्र आता त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे.

कार्तिक ब्रॅण्ड एंडोर्समेंटमधूनही करतो करोडोंची कमाई
चित्रपटांव्यतिरिक्त, कार्तिक ब्रॅण्ड एंडोर्समेंट देखील करतो, ज्यासाठी तो मोठी रक्कम घेतो. मात्र, कार्तिकला त्याच्या पहिल्या जाहिरातीसाठी केवळ 1500 रुपये मिळाले होता. आता तो एका ब्रॅण्ड एंडोर्समेंटसाठी सुमारे 15 लाख रुपये आकारतो. कार्तिक डोरिटोस, वीट मेन, मान्यवर आणि बोट स्पीकर्स सारख्या प्रोडक्टचा ब्रॅण्ड ऍम्बॅसेडर आहे. त्याने आत्तापर्यंत 15 ब्रॅण्ड्सचे एंडोर्समेंट केले आहे.

कार्तिक आर्यन हा चित्रपटसृष्टीतील एक प्रॉमिसिंग स्टार आहे. आगामी काळात तो बॉलिवूडचा सुपरस्टार ठरेल, असा विश्वास वर्तवला जातोय. चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्तिकची फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे.

कार्तिक आर्यनची लव्ह लाईफ

2020 मध्ये कार्तिक आर्यनचा 'लव्ह आज कल 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कार्तिकसोबत सारा अली खान मुख्य भूमिकेत होती. त्याकाळात त्यांच्या डेटिंगच्या बातम्या चर्चेत होत्या. मात्र, दोघांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आले नव्हती. पण या सर्व बातम्यांनंतर कार्तिकने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो सध्या कुणालाही डेट करत नसून सिंगल आहे.

त्याच्या या वक्तव्यानंतर अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, साराची आई अमृता सिंग यांना हे नाते आवडले नाही, त्यामुळे दोघांचे ब्रेकअप झाले.

काही दिवसांपूर्वी जेव्हा सारा अली खान आणि जान्हवी कपूर 'कॉफी विथ करण'मध्ये सहभागी झाल्या होत्या, तेव्हा करण जोहरने उलगडा केला होता की, सारा कार्तिक आर्यनला डेट करत होती आणि आता त्यांचे ब्रेकअप झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...