आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिक आर्यनचा रिलेशनशिप स्टेटसवर खुलासा:सारा अली खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर म्हणाला- मी गेल्या 1 वर्षांपासून सिंगल आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने अलीकडेच फिल्म कंपेनियनला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला. कार्तिक अनेकदा अभिनेत्री सारा अली खानसोबतच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत असतो. पण तो पहिल्यांदाच त्याच्या लव्ह लाईफबद्दल बोलला आहे. आपण आता सिंगल असल्याचे त्याने सांगितले आहे.

कार्तिक 1 वर्षापासून आहे सिंगल
कार्तिक म्हणाला, 'गेल्या दीड वर्षांपासून मी सिंगल आहे. मला बाकी काही माहीत नाही,' असे कार्तिकने सांगितले. यानंतर कार्तिकला विचारण्यात आले की तो आपले काम हेच आपले रिलेशनशिप असल्याचे सांगणार का? याचे उत्तर देताना तो म्हणाला, 'नाही तसं नाही, पण मी सध्या सिंगल आहे. इतकेच.'

कार्तिकने साराला सोशल मीडियावरून केले आहे अनफॉलो
साराने काही वर्षांपूर्वी कॉफी विथ करणमध्ये तिचे वडील सैफ अली खानकडे कार्तिकवर क्रश असल्याची कबुली दिली होती. यासोबतच साराने कार्तिकला डेट करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्यानंतर जेव्हा दोघांनी 'लव्ह आज कल 2' मध्ये एकत्र काम केले तेव्हा त्यांच्या अफेअरच्या अफवांना वेग आला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. मात्र आता कार्तिकने साराला इन्स्टाग्रामवर अनफॉलोही केल्याचे म्हटले जात आहे.

कार्तिक आर्यन-सारा अली खानचे आगामी प्रोजेक्ट्स

कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या त्याच्या आगामी 'शहजादा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक असेल. याशिवाय कार्तिक 'कॅप्टन इंडिया' आणि 'सत्यप्रेम की कथा'मध्येही दिसणार आहे. त्याचबरोबर सारा सध्या पवन कृपलानीच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय सारा पहिल्यांदाच लक्ष्मण उतेकरच्या अनटायटल चित्रपटात विकी कौशलच्या सोबत पडद्यावर दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...