आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच दोघेही त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले. खरंतर, ख्रिसमसच्या वेळी कार्तिक आणि सारा वेगवेगळ्या ठिकाणी व्हेकेशन साजरे करण्यासाठी गेले होते. सारा लंडनहून तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि मित्रांसोबत फोटो शेअर करत होती, तर दुसरीकडे कार्तिक पॅरिसमध्ये सुट्टीचा आनंद घेत होता. पण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दोघांनी एकाच ठिकाणचे फोटो शेअर केले. यातील खास गोष्ट म्हणजे दोघांनी हे फोटो जवळपास एकाच वेळी शेअर केले होते. त्यामुळे दोघांनी एकाच ठिकाणी एकत्र नवीन वर्ष साजरे केल्याचा अंदाज चाहते वर्तवत आहेत.
लंडनमध्ये एकत्र सुटी एन्जॉय करत आहेत कार्तिक-सारा?
रविवारी (1 जानेवारी) साराने काचेच्या ख्रिसमस ट्रीमध्ये क्लिक केलेला तिचा फोटो शेअर करून चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तर कार्तिकने एका रेस्तराँमध्ये चहा घेतानाचा फोटो शेअर केला. कार्तिकने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ब्लॅक टी फक्त माझ्यासाठी.' यासह, दोघांनी जे लोकेशन मार्क केले ते एकच आहे. यावरुन दोघेही एकाच ठिकाणी असल्याची हिंट त्यांनी दिली आहे.
कार्तिक-सारा एकाच वेळी एकाच ठिकाणचे फोटो शेअर करत आहेत
पुढे साराने एक कोलाज शेअर केला, ज्यामध्ये ती इब्राहिम आणि मित्रांसोबत एका जत्रेत दिसत आहे. तर कार्तिकने अनेक रंगांनी उजळलेल्या लंडनचा अस्पष्ट फोटो देखील शेअर केला. याशिवाय कार्तिकने पॅरिसहून लंडनला येतानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. आता हे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स दोघेही लंडनमध्ये एकत्र फिरत असल्याचा अंदाज वर्तवत आहेत.
कॉफी विथ करणमध्ये साराने कार्तिकला डेट करण्याची व्यक्त केली होती इच्छा
काही वर्षांपूर्वी साराने कॉफी विथ करणमध्ये तिचे वडील सैफ अली खानसमोर कार्तिकवर तिचे क्रश असल्याचे सांगितले होते. यासोबतच साराने कार्तिकला डेट करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. अशा परिस्थितीत जेव्हा दोघांनी 'लव्ह आज कल 2' मध्ये एकत्र काम केले तेव्हा त्यांच्या अफेअरच्या अफवांना वेग आला होता. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या बातम्याही चर्चेत होत्या. कार्तिकने साराला इन्स्टाग्रामवर अनफॉलोही केल्याची बातमी समोर आली होती.
कार्तिक आर्यन आणि सारा अली खानचे आगामी प्रोजेक्ट्स
कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो त्याचा आगामी चित्रपट 'शहजादा'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक असेल. याशिवाय कार्तिक 'कॅप्टन इंडिया' आणि 'सत्यप्रेम की कथा'मध्येही दिसणार आहे. दुसरीकडे सारा लक्ष्मण उतेकर यांच्या अनटाइटल्ड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत विकी कौशलही दिसणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.