आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनचा परिणाम:बॉलिवूडला होऊ शकतं 7500 कोटींचे नुकसान, कार्तिक आर्यन मुलाखतीत म्हणाला - 'मी मानधनात कपात करायला तयार'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जर चित्रपटसृष्टीला यामुळे मदत मिळणार असेल तर मी काय सगळ्यांनीच असा निर्णय घ्यायला हवा, असे कार्तिक म्हणाला.

लॉकडाऊनच्या काळातसुद्धा अभिनेता कार्तिक आर्यन रिकामा बसलेला नाहीये. त्याने स्वतःचे युट्यूब चॅनल सुरु केले असून त्यावर तो 'कोकी पुछेगा' नावाचा एक शो घेऊन आला आहे,  त्यात तो कोरोनाला हरवणा-या कोरोना योद्ध्यांच्या मुलाखती घेताय.  हा शो त्याच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. कार्तिककडून होऊ शकेल तेवढी तो कोरोनाबाबत जनगागृतीचा प्रयत्न करीत आहे. 

नुकतीच त्याने चित्रपट समीक्षक आणि अभ्यासक अनुपमा चोप्रा यांना एक मुलाखत दिली आहे, यात त्याने कोरोनामुळे चित्रपट उद्योगावर झालेल्या परिणामाबाबत चर्चा केलीये.

अनुपमा यांनी कार्तिकसोबत बातचीत करताना सांगितले की, गेल्या काही दिवसात त्यांनी चित्रपट जगतातील अनेकांसोबत वेबिनार केलेत,  त्यात चित्रपट जगताच्या भविष्यावर चर्चा सुरु आहे, या सगळ्या चर्चात एक मुद्दा प्रकर्षाने समोर येतोय, तो म्हणजे चित्रपट सृष्टीला कोरोनामुळे 7500 कोटींचे नुकसान झेलावे लागेल, शुटिंग कमी लोकांमध्ये केले जाईल. अशा परिस्थितीत स्टार्ससुद्धा कमी पैशात काम करतील का? असा सवाल त्यांनी केला.

याच्या उत्तरात कार्तिक म्हणाला, मी लोकांना नोकरीवरून कमी करण्याच्या बाजूने नाही, यावर काही तरी तोडगा नक्कीच काढायला हवा, ज्यात लोकांच्या नोक-याही जाणार नाही आणि निर्मात्यांचे नुकसानही होणार नाही. कुठेतरी सुवर्णमध्ये गाठण्याची गरज असल्याचे मत कार्तिकने व्यक्त केले. यात माझ्याकडून जे होईल ते मी करेलच, मात्र सगळ्यांना सोबत काहीतरी निर्णय घ्यावा लाागेल, असेही कार्तिक म्हणाला.  

मानधन कमी करण्याबाबत कार्तिक म्हणाला, जर चित्रपटसृष्टीला यामुळे मदत मिळणार असेल तर मी काय सगळ्यांनीच असा निर्णय घ्यायला हवा, यासाठी आम्ही तयारच राहिले पाहिजे. देशाला आणि चित्रपट उद्योगाला या संकटाचा मोठा फटका बसल्याचे कार्तिकने म्हटले. 

बातम्या आणखी आहेत...