आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 2' ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. याविषयीचे पोस्टर निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. आता हा हॉरर कॉमेडी चित्रपट 20 मे 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी यापूर्वी 25 मार्च रोजी 'भूल भुलैया 2' रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. पण, एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर'सोबत बॉक्स ऑफिसवरील संघर्ष टाळण्यासाठी 'भूल भुलैया 2'च्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाची रिलीज डेट 2 महिन्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
'RRR' 25 मार्चला सिनेमागृहात रिलीज होणार आहे
'RRR'च्या निर्मात्यांनी 31 जानेवारीला चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. निर्मात्यांनी पोस्ट शेअर करून सांगितले की, 'RRR' 25 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या घोषणेनंतर 'RRR' आणि 'भूल भुलैया 2'ची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणे निश्चित होते.
क्लॅशच्या भीतीने 'भूल भुलैया 2'च्या निर्मात्यांनी रिलीजची तारीख बदलली
पण, असे झाले असते तर 'RRR'मुळे 'भूल भुलैया 2'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर वाईट परिणाम झाला असता. या संघर्षाच्या भीतीमुळे, 'भूल भुलैया 2' च्या निर्मात्यांनी 'RRR'ची रिलीज डेट जाहीर होताच केवळ 2 दिवसांत त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली.
अक्षयच्या चित्रपटाचा सिक्वेल 'भूल भुलैया 2'
अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया 2' या सायकॉलॉजिकल कॉमेडी थ्रिलरमध्ये कार्तिकसह कियारा अडवाणी, तब्बू, राजपाल यादव आणि गोविंद नामदेव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. फरहाद सामजी आणि आकाश कौशिक यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. भूषण कुमार, मुराद खेतानी आणि कृष्ण कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
'भूल-भुलैया 2' हा 2007 साली प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमार आणि विद्या बालन स्टारर 'भूल-भुलैया' चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'भूल भुलैया'चे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते. त्याचबरोबर 'RRR'मध्ये ज्युनियर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगणसारखे मोठे स्टार्स लीड रोलमध्ये आहेत. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या 5 भाषांमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.