आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या विळख्यात बॉलिवूड:कार्तिक आर्यनला पुन्हा कोरोनाची लागण, पोस्ट शेअर करत म्हणाला - 'कोविड से रहा नहीं गया'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्यावर्षी मार्च महिन्यात कार्तिकला पहिल्यांदा कोविड 19 ची लागण झाली होती.

'भूल भुलैय्या 2' या चित्रपटामुळे सध्या प्रसिद्धीझोतात असलेला अभिनेता कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्याचे वृत्त असून अभिनेता कार्तिक आर्यनसुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. कार्तिकला दुस-यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यानेने मिश्कीलपणे ही गोष्ट चाहत्यांना सांगितली आहे. सोशल मीडियावर त्याने मजेदार कॅप्शन दिले आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात कार्तिकला पहिल्यांदा कोविड 19 ची लागण झाली होती.

आता कार्तिक दुस-यांदा कोरोनाबाधित झाला आहे. सोशल मीडियावर याची माहिती देताना त्याने स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने त्याच्या 'भूल भुलैया 2' च्या यशाकडे लक्ष वेधत कॅप्शनमध्ये लिहिले - "सब कुछ इतना पॉझिटिव्ह चल रहा था, कोविड से रहा नहीं गया" यासोबत त्याने एक इमोजीही जोडला आहे. त्याची ही पोस्ट समोर आल्यानंतर चाहते त्याच्या पोस्टवर कमेंट करत त्याला स्वतःची काळजी घेण्यास सांगत आहेत.

यापूर्वी गेल्याच महिन्यात अभिनेता अक्षय कुमारलासुद्धा दुस-यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला कान चित्रपट महोत्सावाला हजेरी लावता आली नव्हती.

कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकताच त्याचा भूल भुलैय्या 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा चित्रपट कार्तिकच्या करिअरमधील सुपरहिट चित्रपट ठरला आहे. 2007 मध्ये अक्षय कुमार स्टारर 'भूल भुलैया' रिलीज झाला होता. या चित्रपटाचा पहिला भागही प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता या चित्रपटाची फ्रेंचाइजी 'भूल भुलैया 2'ला देखील प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसह कियारा अडवाणी, संजय मिश्रा, तब्बू, राजपाल यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...