आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवा रेकॉर्ड:अभिनेता कार्तिक आर्यनने बनवला नवा विक्रम, अवघ्या 10 दिवसांत पूर्ण केले 'धमाका'चे चित्रीकरण

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 300 लोकांची होती टीम

कार्तिक आर्यनचा आगामी थ्रिलर ‘धमाका’चे शूटिंग धमाकेदार शैलीत पूर्ण झाले आहे. फक्त दहा दिवसात पूर्ण झालेल्या या चित्रपटाचे लोकेशन हाॅटेलमध्ये होते. कोरोनामुळे त्याचे लोकेशन पूर्णपणे बायो बबलमध्ये ठेवण्यात आले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानीने केले आहे.

300 लोकांची होती टीम
‘धमाका’च्या कलाकार आणि क्रूने हॉटेलमध्येच राहुन बायो बबल बनवले. काही दृश्यच आधीच बाहेर शूट करण्यात आले होते. एचटीच्या बातमीनुसार, चित्रपटाच्या युनिटमध्ये 300 लोक होते. प्रॉडक्शन टीमने पूर्ण हाॅटेल बुक केले होते. सोबतच सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली होती.

कार्तिकने शेअर केला होता फर्स्ट लूक
अभिनेता कार्तिक आर्यनने गेल्या आठवड्यातच या चित्रपटातील आपला पहिला लूक शेअर केला आहे. या चित्रपटात तो 'अर्जुन पाठक' नावाच्या पत्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा पत्रकार मुंबईवर झालेल्या हल्ल्याचे लाइव्ह कव्हरेज करतो.

कार्तिकने फोटो शेअर करत 'धमाका'च्या अर्जुन पाठकाला भेटा, असे कॅप्शन दिले आहे. त्याच्या शर्टावर रक्ताचे डाग दिसत आहे. या चित्रपटाची घोषणा कार्तिकने 22 नोव्हेंबर रोजी आपल्या वाढदिवशी केली होती.

'भूल भूलैया 2' आणि 'दोस्ताना 2' वर काम करतोय कार्तिक
'धमाका' व्यतिरिक्त कार्तिक आगामी 'भूल भुलैया 2' आणि 'दोस्ताना 2' या आगामी चित्रपटांवरही काम करत आहे. 'लव आज कल' हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान दिसली होती. कार्तिकचा हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा पसंत पडला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...