आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आपण सर्वजण मोबाइल गेम्सने कंटाळलो आहोत आणि या लॉकडाऊनमुळे आता टाइमपास करणेही कठीण झाले आहे. पण असे दिसते की आपला कंटाळवाणा दूर करण्यासाठी जर कुणी पुढे येत असेल तर तो कार्तिक आर्यनशिवाय इतर कुणी असू शकत नाही. त्याचे क्रेझी आयडिया सर्वांना हसवत आहेत. अलीकडेच कार्तिकने त्याच्या टिक टॉक अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपल्या बहिणीसोबत दिसला आहे.
व्हिडिओमध्ये, कार्तिक एक एक्सटेंशन बोर्ड घेऊन बसलेला आहे आणि त्यावर तो कोई मिल गया या चित्रपटातील एलियनला बोलावणारे म्युझिक वाजवतोय. त्याच वेळी त्याची बहीण कृतिका येते आणि प्रीती झिंटाने चित्रपटात म्हटलेल्या संवादची पुनरावृत्ती करते - 'अरे तू हे वाजवले.' यावर कार्तिक सुपरस्टार हृतिक रोशनच्या डायलॉगची पुनरावृत्ती करतो -' ही धून मला येते, आईने मला शिकवली होती.' कार्तिकचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on InstagramA post shared by Pallav Paliwal (@pallav_paliwal) on Apr 17, 2020 at 7:13am PDT
कार्तिक घरात असतानाही खूप व्यस्त आहे. तो सतत जनजागृती करीत आहेत. यासाठी त्याने ‘कोकी पुछेगा’ ही सीरिज यूट्यूबवर सुरु केली आहे. या सीरिजअंतर्गत तो कोरोना फाइटर्सची मुलाखत घेत आहे. कार्तिक सतत या जागतिक साथीच्या रोगाबद्दल जागरूकता पसरवण्याचे काम करतोय.
#CoronaStopKaroNa मोनोलॉगपासून ते रॅपपर्यंत, विविध माध्यमातून तो लोकांमध्ये जागरुकता पसरवतोय. त्याच्या या उपक्रमाचे पीएम मोदी यांनीही कौतुक केले आहे. इतकेच नाही तर कार्तिकने या साथीच्या रोगाशी लढा देण्यासाठी पीएम केअर रिलीफ फंडामध्ये 1 कोटीची देणगीही दिली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.