आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवशी कार्तिक आर्यन सिद्धिविनायकाच्या चरणी:व्हाइट कुर्ता आणि ब्लॅक डेनिममध्ये दिसला हॅण्डसम

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिक आर्यन आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी कार्तिक सिंपल लूकमध्ये अतिशय हॅण्डसम दिसला. त्याने व्हाइट कुर्त्यासह ब्लॅक डेनिम घातली होती. कार्तिकने यावेळी पापाराझींना पोजही दिसली. यावेळी चाहत्यांनीही त्याच्याभोवती गराडा घातला होता. कार्तिकने चाहत्यांना निराशा न करता त्यांच्यासोबत सेल्फी घेतली.

कार्तिकच्या चाहत्यांना सरप्राइज

कार्तिक आर्यनच्या वाढदिवसाचे औचित्य साधत निर्मात्यांनी त्याच्या बहुप्रतिक्षित ‘शहजादा’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. या चित्रपटात कार्तिक जबरदस्त अॅक्शनमध्ये दिसत आहे. या चित्रपटातील कार्तिकच्या पात्राचे नाव बंटू आहे. या चित्रपटात क्रिती सेनन त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे.

आईवडिलांनी दिले कार्तिकला सरप्राइज​​​​​​​

​​​​​​​या खास निमित्ताने कार्तिकच्या आईवडिलांनी काल रात्री त्याला सरप्राइज दिले होते. या सेलिब्रेशनचे काही फोटो कार्तिकने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याची खोली फुग्यांनी सजलेली दिसत असून टेबलवर 'हॅपी बर्थडे कोकी' असे लिहिलेला केक ठेवला आहे. सेलिब्रेशनचे हे फोटो शेअर करत कार्तिकने लिहिले, 'प्रत्येक जन्मात मला तुमचा कोकी म्हणून जन्म घ्यायला आवडेल.. वाढदिवसाच्या या सुंदर सरप्राईजसाठी आई-पप्पा, कटोरी आणि किकीचे आभार.'

कार्तिक आर्यनचे आगामी प्रोजेक्ट्स

​​​​​​​कार्तिक आर्यनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच 'फ्रेडी' या चित्रपटात दिसणार आहे. शशांक घोष दिग्दर्शित 'फ्रेडी' या थ्रिलर चित्रपटात आलिया एफ कार्तिकसोबत दिसणार आहे. याशिवाय तो 'सत्यप्रेम की कथा', 'आशिकी 3', 'शहजादा' आणि 'कॅप्टन इंडिया' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...