आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'धमाका'बद्दल मोठा दावा:कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने वरुण धवन-अक्षय कुमारच्या चित्रपटांना मागे टाकले, ठरला OTT वर विकला गेलेला सर्वात महागडा चित्रपट

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 135 कोटींना विकले गेले 'धमाका'चे हक्क

कार्तिक आर्यन स्टारर 'धमाका' हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकला गेलेला आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट ठरला आहे. रिपोर्ट्सनुसार, कार्तिकच्या या चित्रपटाने अभिनेता वरुण धवन तसेच सुपरस्टार अक्षय कुमार यांच्या चित्रपटांना मागे टाकले आहे. वरुणच्या 'कुली नं. 1' ( अ‍ॅमेझॉन प्राइम) आणि अक्षयच्या 'लक्ष्मी' (डिस्ने प्लस हॉटस्टार) चे डिजिटल हक्क अनुक्रमे 90 कोटी आणि 110 कोटीला विकले गेले होते.

135 कोटींना विकले गेले 'धमाका'चे हक्क
स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, धमाकासाठी नेटफ्लिक्सने 135 कोटींचा करार केला आहे. 'धमाका'चे वैशिष्ट्य म्हणजे हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत 24 तासांचा थ्रिलर फॉर्मॅट चित्रपट आहे. या व्यतिरिक्त कार्तिक आर्यन तरुणाईमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेला कलाकार आहे. हेच कारण आहे की नेटफ्लिक्सला या चित्रपटावर इतकी मोठी रक्कम खर्च करण्यात कोणतीही अडचण आली नाही.

या चित्रपटाचा टीझर मार्चमध्ये प्रदर्शित झाला होता
मार्चमध्ये 'धमाका'चा टीझर रिलीज झाला होता. राम माधवानी दिग्दर्शित हा चित्रपट 'द टेरर लाइव्ह' या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात कार्तिक शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरूद्ध लढत असलेल्या पत्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याच्या या पात्राचे नाव अर्जुन पाठक आहे.

चित्रपटाचे शूटिंग अवघ्या 10 दिवसात झाले
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये 'धमाका'चे शूटिंग अवघ्या 10 दिवसात पूर्ण झाले. रिपोर्टनुसार, कार्तिकने 14 दिवसांच्या तारखा दिल्या. तो दररोज 8 तास काम करत असे. पण त्याने अनेक वेळा ओव्हरटाइमही केला. त्याची तयारी व भूमिकेविषयी समजून घेतल्यामुळे शूटिंग वेळेपूर्वीच पूर्ण झाले होते. इतक्या कमी वेळात चित्रीकरण पूर्ण करणारा हा मेन स्ट्रीममधील पहिला चित्रपट आहे.

यामुळे झाले 10 दिवसांत शूटिंग शक्य
चित्रपटाचे दिग्दर्शक राम माधवानी यांनी शूटवर जाण्याआधी प्री-प्रॉडक्शनवर जास्त काम केले होते. त्यांनी मुंबई विमान तळाजवळील हॉटेलचे सर्व खोल्या 10 दिवसांसाठी बुक केल्या होत्या. प्रत्येक दृश्य 7 कॅमेरा सेटअपने शूट केले होते. त्यामुळे सर्व कलाकाराचे हावभाव एकाच वेळी कॅमेऱ्यात कैद झाले. याचा फायदा झाला. हे कॅमेरे कलाकारांवर चहूबांजीनी फोकस करण्यात आले होते. यात वेगवेगळे दृश्यदेखील एकाच वेळी शूट करण्यात आले. शूटवर जाण्याच्या आधी कलाकार, लेखक आणि दिग्दर्शकाने झूम कॉलवर दोन आठवडे स्क्रिप्ट वाचली. प्रत्येकाने कलाकाराने सेटवर किमान चार रीटेक घेण्याचा विचार केला होता. योगायोगाने, कार्तिक आर्यन, अमृता सुभाष आणि मृणाल ठाकूर इत्यादींनी दोन ते तीन रीटॅकमध्ये शूट केले.

शूटिंग लोकेशन एक हॉटेल होते
चित्रपटाचे लोकेशन एक हॉटेल होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण टीम बायो बबलमध्ये होती. चित्रपटाचे काहीच दृश्य आउटडोअर चित्रीत करण्यात आले. चित्रपटाच्या यूनिटमध्ये 300 लोक होते. प्रोडक्शन टीमने संपूर्ण हॉटेल बुक केले होते. तसेच, सर्व सेफ्टी प्रोटोकॉलचे पालन केले गेले आणि कोणत्याही बाहेरील व्यक्तीला हॉटेलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नव्हती.

बातम्या आणखी आहेत...