आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

49 वर्षांची झाली कश्मिरा:विवाहित असूनही गोविंदाच्या भाच्याच्या प्रेमात पडली होती कश्मिरा शाह, 14 वेळा प्रेग्नेंसी फेल झाल्यानंतर सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची झाली आई

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्माता ब्रॅड लिस्टरमनसोबत कश्मिराचे पहिले लग्न झाले होते.

अभिनेत्री, मॉडेल आणि आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली कश्मिरा शाह हिने वयाची 49 वर्षे पूर्ण केली आहेत. 2 डिसेंबर 1971 रोजी मुंबईत जन्मलेली करिश्मा वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणा-या बिग बॉसच्या सहाव्या पर्वात सहभागी झाली होती. 2013 मध्ये तिने कॉमेडिअन आणि टीव्ही अभिनेता कृष्णा अभिषेकसोबत लग्न केले. कृष्णा हा गोविंदाचा भाचा आहे. 2005 मध्ये दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. 'और पप्पू पास हो गया'च्या शूटिंगदरम्यान जयपूरमध्ये दोघे पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी ती विवाहित होती. निर्माता ब्रॅड लिस्टरमनसोबत तिचे लग्न झाले होते.

One-Night Stand नंतर कृष्णाच्या प्रेमात पडली कश्मिरा
अभिनेत्री कश्मिरा शाह कृष्णासोबत लग्नगाठीत अडकण्यापूर्वी त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. मात्र या दोघांची प्रेमकहाणी कशी सुरु झाली हे फारच थोड्या जणांना ठाऊक आहे. कृष्णाच्या प्रेमात कशी पडली, याविषयी कश्मिराने काही दिवसांपूर्वी मीडियाला सांगितले होते. कश्मिरा म्हणाली होती, ''पहिल्या भेटीतच आम्ही दोघेही शारीरिकरित्या एकमेकांकडे आकर्षित झालो होतो. त्यामुळे आमची पहिलीच भेट वन नाईट स्टँडमध्ये बदलली. आमची पहिली भेट 'पप्पू मिल गया' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. रात्रीची वेळ होती. चित्रपटाचे दिग्दर्शक सजन सोनीजी माझ्याकडे चित्रपटाची ऑफर घेऊन आले. माझ्या अपोझिट कृष्णा असल्याचे सजन यांनी सांगितले आणि त्यांनी माझी भेट कृष्णाशी घडवून दिली. व्हॅनिटी व्हॅनमध्ये आमच्या प्रेमाला सुरुवात झाली. रात्र झाली होती आणि आम्ही दोघेही व्हॅनमध्ये बसलो होतो. तेव्हा अचानक लाईट गेले. कृष्णाने मला विचारले, आता काय करुया. मी त्याला विचारले, का काही करायचे आहे का ? त्या रात्री आमच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले होते. अशाप्रकारे आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो.''

कश्मिराकडून झाली होती रिलेशनशिपला सुरुवात
आपल्या रिलेशनशिप विषयी कृष्णाने खुलासा केला होता, की सुरुवातीला कश्मिराच मला हिंट्स देत होती. वन नाइट स्टँड नंतर ती माझ्याविषयी जरा जास्तच केअरिंग झाली होती. तिने आपल्या घरुन माझ्यासाठी जेवण आणणे सुरु केले होते.

2013 मध्ये गुपचुप केले लग्न
बरीच वर्षे डेटिंग आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानतंर कश्मिराने कृष्णासोबत 2013 मध्ये लग्न केले. हे लग्न गुप्त ठेवण्यात आले होते. 23 जुलै रोजी कृष्णाने तिला लग्नाची मागणी केली, आणि दुस-याच दिवशी म्हणजे 24 जुलैला दोघे लग्नगाठीत अडकले.

दहा गुलाब देऊन साजरी केली होती डेटींग अॅनिव्हर्सरी
10 जुलै 2015 रोजी कृष्णा अभिषेक आणि कश्मिरा शाह यांच्या पहिल्या डेटिंगला दहा वर्षे पूर्ण झाली होती. ही डेटिंग अॅनिव्हर्सरी दोघांनी हटके पद्धतीने साजरी केली होती. यानिमित्त कश्मिराने दहा गुलाबाची फुले देऊन कृष्णाला शुभेच्छा दिल्या. दोघे लग्नापूर्वी एका रिअॅलिटी शोमध्ये सेलिब्रिटी कपलच्या रुपात दिसले होते.

सरोगसीद्वारे झाले आईवडील
कृष्णा आणि कश्मिरा मे 2017 मध्ये ट्विन्स (मुलांचे) पॅरेंट्स बनले. त्यांच्या मुलांचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाल. मुलांच्या जन्मानंतर एका मुलाखतीत कश्मिराने सांगितले होते की, 'फॅमिली प्लानिंगसाठी मी कामापासून ब्रेक घेतला होता. अनेक वर्षे मी कंसीव करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा नैसर्गिक पद्धतीने मला गर्भधारणा झाली नाही तेव्हा मी IVF च्या माध्यमातून आई होण्याचा प्रयत्न केला. मात्र 14 वेळा अपयश माझ्या वाट्याला आले. माझी प्रकृती ढासळू लागली होती. माझे वजनही खूप वाढले होते. मी सरोगेट मदरचे मनापासून आभार मानते. तिने माझ्या मुलांना जन्म दिला आणि वेदना सहन केल्या.' कृष्णा आणि कश्मिरा यांच्या मुलांची नावे रयान आणि क्रिशांक आहेत.

कश्मिराने या चित्रपटांत केले आहे काम
कश्मिराने 1996 मध्ये एका तेलुगू चित्रपटात आयटम साँगद्वारे डेब्यू केला होता. त्यानंतर तिने 'यस बॉस'मध्ये एक छोटी भूमिका केली.प्यार तो होना ही था (1998), हिंदुस्तान की कसम, हेराफेरी (1999), आखे (2002), मर्डर (2004) आणि वेकअप सिड (2009) सारख्या चित्रपटांत कश्मिरा झळकली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser