आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज कमाईचा विक्रम करत आहे 'द कश्मीर फाइल्स':चित्रपटाने 5 व्या दिवशी केली 18 कोटींची कमाई, आतापर्यंत जमवला 60 कोटींचा गल्ला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'द कश्मीर फाइल्स'ने प्री आणि पोस्ट कोविड रिलीज चित्रपटांना पछाडले

'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट दररोज कमाईचे नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. रिलीजच्या पाचव्या दिवशी या चित्रपटाने 18 कोटींची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत 20% वाढ झाली आहे. यासोबतच अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी', आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' आणि रणवीर सिंगच्या '83' या चित्रपटांना या चित्रपटाला मागे टाकले आहे.

अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' हा चित्रपटही याच आठवड्यात 18 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. आता 'सूर्यवंशी'ला पछाडणा-या द कश्मीर फाइल्सचा जलवा 'बच्चन पांडे'समोर कायम राहतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पाचव्या दिवशी केली 18 कोटींची कमाई
तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून पाचव्या दिवशी या चित्रपटाने भारतात 18 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले असल्याचे सांगितले आहे. चित्रपटाने चौथ्या दिवशी (सोमवार) 15.05 कोटी रुपये, तिस-या दिवशी (रविवार) 15.10 कोटी, दुसऱ्या दिवशी (शनिवार) 8.50 कोटी रुपये आणि पहिल्या दिवशी 3.55 कोटी रुपयांची कमाई केली. या अर्थाने, चित्रपटाने आतापर्यंत भारतात पाच दिवसांत 60.20 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवले आहे. तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, 'द कश्मीर फाइल्स' हा स्मॅश हिट आहे आणि तो ब्लॉकबस्टर ठरु शकतो.

'द कश्मीर फाइल्स'ने प्री आणि पोस्ट कोविड रिलीज चित्रपटांना पछाडले
तरण आदर्श यांनी आपल्या दुसर्‍या पोस्टमध्ये सांगितले की, बहुतांश मंगळवारी म्हणजेच वर्किंग डेजमध्ये चित्रपटांच्या कलेक्शनमध्ये घट झाल्याचे दिसून येत असते. पण, 'द कश्मीर फाइल्स'च्या बाबतीत असे घडलेले नाही. कोविडनंतरच्या काळात पाचव्या दिवशी हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे, असे तरण आदर्श म्हणाले आहेत.

'द कश्मीर फाईल्स'ने या बाबतीत 'सूर्यवंशी', 'गंगूबाई काठियावाडी' आणि '83' या प्री-कोविड रिलीज चित्रपटांनाही मागे टाकले आहे. पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी 'सूर्यवंशी'ने 11.22 कोटी, 'गंगूबाई'ने 10.01 कोटी आणि '83'ने 6.70 कोटींची कमाई केली होती. तर 'तान्हाजी'ने 15.28 कोटी रुपये आणि 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'ने 9.57 कोटी रुपयांची कमाई केली होती.

अमित शहा यांनी घेतली टीमची भेट
पंतप्रधान मोदींनी चित्रपटाचे कौतुक केल्यानंतर आता गृहमंत्री अमित शहा यांनी 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या टीमची भेट घेतली आहे. चित्रपटाचे अभिनेते अनुपम खेर यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

अमित शाह यांनी चित्रपटाच्या टीमसोबत नाश्ताही केला.
अमित शाह यांनी चित्रपटाच्या टीमसोबत नाश्ताही केला.

पीएम मोदींनी 'द कश्मीरच्या फाइल्स'चे केले कौतुक
15 मार्चला झालेल्या भाजप संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे कौतुक कले. असे चित्रपट बनत राहिले पाहिजे, असे ते म्हणाले होते. ते म्हणाले की, चित्रपटात जे दाखवले आहे, ते सत्य नेहमीच दाबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.' या चित्रपटातून सत्य समोर आणण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

या चित्रपटाचे कौतुक करताना त्यांनी पुढे म्हटले की, ‘हे सत्य दडपण्यासाठी एक इकोसिस्टम काम करते. सत्य समोर आणण्यासाठी असे आणखी चित्रपट बनवले पाहिजेत.

बातम्या आणखी आहेत...