आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाला 'प्रपोगंडा' आणि 'अश्लील' चित्रपट म्हणणारे इस्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपिड यांनी आता आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या वक्तव्यामुळे एखादी व्यक्ती दुखावली गेली असले तर मी त्याबद्दल माफी मागतो, असे नदाव यांनी म्हटले आहे. गोव्यातील 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी 'द कश्मीर फाइल्स'विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते.
कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता - नदाव
नदाव लॅपिड यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले - "मला कोणाचाही अपमान करायचा नव्हता. पीडितांच्या भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो." नदाव यांनी म्हटले की, त्यांनी जे वक्तव्य केले, ते फक्त त्यांचे मत नव्हते तर तिथे उपस्थित सर्वांचेही हेच म्हणणे होते.
नदाव लॅपिड यांच्या या विधानाने उडाली होती खळबळ
गोव्यात झालेल्या 53 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये इस्रायली चित्रपट निर्माते आणि या महोत्सवातील ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी द कश्मीर फाइल्स या चित्रपटावर टीका केली होती. "द काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित झालो आहोत. हा चित्रपट म्हणजे त्रस्त करणार अनुभव आहे. हा चित्रपट आम्हाला व्हल्गर तसेच प्रपोगंडा वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणे योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणे गरजेचे आहे," असे लॅपिड म्हणाले होते.
नदाव लॅपिड यांच्या वक्तव्यावर सेलिब्रिटींनी आक्षेप घेतला
द कश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, अभिनेता अनुपम खेर, दर्शन कुमार आणि चित्रपट निर्माते अशोक पंडित यांच्यासह अनेकांनी नदाव लॅपिड यांच्या विधानावर आक्षेप घेतला. अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले- "असत्याची उंची कितीही मोठी असली तरी सत्याच्या तुलनेत ती नेहमीच लहान असते."
तर विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले - “सत्य ही फार भयानक गोष्ट आहे, सत्य कोणालाही खोटं बोलायला भाग पाडू शकते.”
विवेक अग्निहोत्री
अनुपम खेर-
हा चित्रपट 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित आहे.
11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटात 1990 च्या काश्मिरी हिंदूंच्या निर्गमन आणि नरसंहाराची कथा दाखवण्यात आली आहे. अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि मिथुन चक्रवर्ती या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. द कश्मीर फाइल्स या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. चित्रपटाने वर्ल्डवाइड 330 कोटींचा व्यवसाय केला होता. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.