आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट यावर्षी 11 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात अडकला असून अजूनही हा वाद शमलेला नाही. 'द कश्मीर फाइल्स'वरुन चांगलेच राजकारणही रंगलेले पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी या चित्रपटाचे वर्णन 'अश्लील' आणि 'प्रोपगंडा' चित्रपट म्हणून केले होते. यानंतर लॅपिड यांना आपल्या वक्तव्याबद्दल माफीही मागावी लागली होती.
हा वाद शांत होतोच आहे तर आणखी एका दिग्दर्शकना 'द कश्मीर फाइल्स'बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी 'द काश्मीर फाइल्स'ला 'कचरा' म्हटले आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. 'नुक्कड' आणि 'इंतजार' यासारख्या मालिका याशिवाय 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है?' आणि 'नसीम' सारख्या चित्रपटांसाठी ते प्रसिद्ध आहेत. ते पटकथा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. दरम्यान आता 'द कश्मीर फाइल्स'वरील वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चर्चेत आहेत.
काय म्हणाले सईद अख्तर मिर्झा?
सईद अख्तर मिर्झा म्हणाले, "माझ्यासाठी 'द कश्मीर फाइल्स' हा कचरा आहे. काश्मिरी पंडितांचा मुद्द्याला मी कचरा म्हणत नाहीये. ते वास्तवच होते. पण हे फक्त काश्मिरी हिंदूंच्या बाबतीत घडले होते का? नाही. मुस्लिम देखील त्यावेळी तितकेड भरडले गेले होते. येथे मुद्दा बाजू घेण्याचा नाही. माणूस व्हा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा," असे ते म्हणाले.
''आजकाल देशभक्तीचा उपयोग पैसा कमावण्यासाठी होत आहे. जगभरात प्रत्येकजण हेच करतोय. हे मी फक्त भारतापुरते बोलत नाही,'' असेही मिर्झा म्हणाले.
'द कश्मीर फाइल्स'ने केली 300 कोटींची कमाई
'अभिनेत्री पल्लवी जोशी यांची निर्मिती असलेला द कश्मीर फाइल्स हा चित्रपट अवघ्या 15 ते 25 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 300 कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटात पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, अनुपण खेर, चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार मुख्य भूमिकांमध्ये होते.
'द कश्मीर फाइल्स'संदर्भातील आणखी बातम्या वाचा...
दिव्य मराठी इंडेप्थमध्ये जाणून घ्या, सिनेसृष्टीच्या वर्तुळात राजकारणाचा केव्हा प्रवेश झाला? त्याचे परिणाम काय झाले? कसा फक्त भारतातच नव्हे तर जगभरात सिनेमाचा प्रोपगंडा म्हणून वापर होत राहिला आहे? वाचा सविस्तर
तुम्ही ‘कश्मीर फाइल्स’शी सहमत किंवा असहमत असाल. निर्माते विवेक अग्निहोत्रींच्या राजकीय विचारसरणीवर आक्षेप असू शकतो. पण, सामाजिक जबाबदारीच्या तर्काने पाहिल्यास हिंदी चित्रपट निर्माते नैतिकदृष्ट्या आपली जबाबदारी पार पाडत आहेत का? वाचा सविस्तर...
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान हा चित्रपट काल्पनिक असल्याची अफवा सोशल मीडियावर उडत आहे. आता एका मुलाखतीत विवेक यांच्या पत्नी आणि चित्रपट अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी अशा सर्व अफवांचे खंडन करत चित्रपटासाठी केलेल्या संशोधनाच्या वेदनादायक कथा कथन केल्या आहेत. यासोबतच त्यांच्याकडे चार हजार तासांचे रिसर्च व्हिडिओ आहेत, जे त्यांनी चित्रपट बनवण्यापूर्वी बनवले होते, असेही पल्लवी यांनी स्पष्ट केले. वाचा सविस्तर..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.