आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्टिकल 370 रद्द झाल्याच्या दीड वर्षांनंतर:काश्मीरच्या खो-यात शूटिंगची तयारी, अजय देवगन फिल्म्स, संजय दत्त प्रॉडक्शनसारखे बॅनर पाहणीसाठी पोहोचले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 90 च्या दशकात शूटिंग थांबविण्यात आले होते

काश्मीरचे सुंदर द-या आणि बर्फाच्छादित पर्वत पुन्हा एकदा बॉलिवूडला आकर्षित करत आहेत. बॉलिवूडचे एक शिष्टमंडळ आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी लोकेशन शोधण्यासाठी चार दिवसांच्या काश्मीर दौ-यावर पोहोचले. भारत सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी आर्टिकल 370 रद्द करण्यापूर्वी बाहेरील लोकांना काश्मीर सोडण्यासाठी एडव्हायजरी जारी केली होती. त्यानंतर काश्मीरमध्ये अनेक महिन्यांचा लॉकडाउन होता. परिस्थिती सुधारू लागली होती तोच मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे देशात लॉकडाउन जाहीर झाला. पण आता सुमारे दीड वर्षानंतर हळूहळू परिस्थिती पुर्वपदावर येत आहे.

प्रतिनिधीमंडळात बरेच मोठे बॅनर सामील
प्रतिनिधीमंडळात प्रोड्युसर्स गिल्ड, अजय देवगण फिल्म्स, संजय दत्त प्रॉडक्शन, रिलायन्स एंटरटेनमेंट, रोहित शेट्टी फिल्म्स, झी स्टुडिओ, श्री अधिकारी ब्रदर्स आणि SAB (मराठी), एन्डमोल, राजकुमार हिराणी फिल्म्स, एक्सेल एंटरटेनमेंटसारख्या मोठ्या बॅनर्सशिवाय मुंबईच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

व्हॅली ब्लॅकड्रॉपसाठी उपयुक्त
खो-यात पोहोचलेले निर्माते काश्मीरच्या सौंदर्याने इतके मंत्रमुग्ध झाले आहेत की त्यांनी त्यांचे आगामी चित्रपट येथे शूट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काश्मीरमध्ये शाहरुख खान आणि कतरिना कैफ स्टारर फिल्म ‘जब तक है जान’ या चित्रपटाचे चित्रीकरण करणारे निर्माता आशिष सिंह म्हणतात की, “व्हॅली चित्रपट निर्मात्यांना बॅकड्रॉप्स पुरवते आणि फक्त बॉलिवूड नव्हे तर जगभरातील चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करण्याची क्षमता आहे."

'ही जागा पूर्ण पॅकेज आहे'

प्रोड्यूसर गिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन आहूजा म्हणतात की, काश्मीरशी असलेले जुने नाते पुन्हा जिवंत करायचे आहे. ते म्हणाले, "आम्ही बर्‍याच ठिकाणी गेलो आणि आम्हाला लोकेशन खूपच सुंदर दिसले. आम्हाला स्थानिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. जेवणही चांगले आहे. जागा एक संपूर्ण पॅकेज आहे."

अजय देवगन प्रॉडक्शनच्या सीईओ मीना अय्यर यांनीही काश्मीरच्या सौंदर्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, खो-यात चित्रपट पर्यटनासाठी बराच वाव आहे.

90 च्या दशकात शूटिंग थांबविण्यात आले होते
काश्मीरशी बॉलिवूडचे जुने नाते आहे. डल झील, मोगल गार्डन, गुलमर्ग आणि पहलगाम ही बॉलिवूडची आवडती ठिकाणे आहेत. 60 ते 80 च्या दशकात 'आरजू', 'काश्मीर की कली', 'जब जब फूल खीले', 'कभी कभी', 'सिलसिला', 'सत्ते पे सत्ता' आणि 'रोटी' यासह अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे केले गेले.

90 च्या दशकात दहशतवाद्यांमुळे काश्मीरमधील चित्रपटांचे शूटींग थांबविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर 'मिशन काश्मीर' सारख्या चित्रपटातून निर्माते इथे परत आले. काश्मीरमध्ये चित्रीत झालेले चित्रपट इथल्या पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट प्रमोटर असल्याचे सिद्ध झाले आहे. हेच कारण आहे की पर्यटनाशी निगडीत लोक बॉलिवूडकडे एका नवीन सुरुवात म्हणून आशेने बघत आहेत.

पर्यटन विभाग शूटिंगला मदत करत आहे

काश्मीर टूरिझमचे संचालक जी.एन. इतू म्हणाले की, “पर्यटन सुरू झाल्यापासून काश्मीरला व्यावसायिक जाहिराती, गाण्यांच्या शूटिंगसाठी प्रादेशिक करमणूक गृहासह बॉलिवूडकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या मते, चित्रपट निर्मात्यांना काश्मीरमध्ये नैसर्गिक पार्श्वभूमी मिळते, तर पर्यटन विभागदेखील शुटिंग सुलभ करण्यात मदत करत आहे.

मुसळधार हिमवृष्टीमुळे पर्यटनास चालना मिळाली
यावर्षी हिवाळ्यात काश्मीरचे तापमान शून्य डिग्रीच्या खाली गेले आहे. यामुळे येथील पर्यटन पुनरुज्जीवित होण्यास मदत झाली आहे. मुसळधार हिमवृष्टीमुळे गायक जुबिन नौटियाल, गुरु रंधावा, सलमान अली, संगीतकार सलीम मर्चंट, माजी अभिनेत्री आणि मॉडेल सना खान, टीव्ही होस्ट आणि अँकर आदित्य नारायण आणि बिझनेस टायकून अनिल अंबानी यांच्यासह अनेक सेलेब्स गुलमर्गला आले होते.

बातम्या आणखी आहेत...