आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चांना उधाण:कतरिना कैफ आणि विकी कौशलचा झाला साखरपुडा, रोका सेरेमनीचीही रंगू लागली आहे चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चांना उधाण आले आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. या दोघांनी गुपचुप साखरपुडा उरकल्याची चर्चा आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चांना उधाण आले आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सांगितले, ‘विकी आणि कतरिना यांनी साखरपुडा केल्याची अफवा आहे. दोघांची रोका सेरेमनीदेखील झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीय तोपर्यंत, ही अफवा समजावी,’ या आशयाचे ट्वीट विरलने केले आहे. सध्या त्याचे हे ट्वीट चर्चेत आहे.

कतरिना आणि विकी हे बी-टाउनमधील सध्याचे चर्चेतील कपल आहेत. अनेकदा दोघेही एकत्र फिरताना दिसतात. पण त्या दोघांनीही कधीही त्यांच्या नात्यावर वक्तव्य केलेले नाही.

अशी झाली दोघांच्या नात्याला सुरुवात
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या अफेअरची चर्चा 2018 पासून सुरू झाली. दोघांना जवळ आणण्यात बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा मोठा वाटा आहे. करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये कतरिनाला विचारले होते की, तिच्याबाजूला कोणता अभिनेता शोभेल ? यावर उत्तर देताना कतरिनाने विकी कौशलचे नाव घेतले होते. त्यानंतर याच चॅट शोमध्ये जेव्हा विकी कौशल आला होता, त्यावेळी कतरिनाने दिलेल्या उत्तराबाबत त्याला सांगितले. कतरिनाने दिलेले उत्तर ऐकून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मी आनंदाने बेशुद्ध पडले, असे विकीने म्हटले होते. या शोनंतर जवळजवळ वर्षभराने विकी आणि कतरिना सोबत दिसू लागले होते.