आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्पिताच्या गणेश पूजेला पोहोचले विकी-कतरिना:ट्रेडिशनल लूकमध्ये दिसले कपल, हातात हात धरून दिली पोज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे कुटुंबीय दरवर्षी त्यांच्या घरी बाप्पाचे मोठ्या थाटात आगमन करत असतात. यंदा सलमान खानची धाकटी बहीण अर्पिताने गणपती सोहळ्याचे आयोजन केले आहे. अनेक सेलिब्रिटी गणरायाचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे पोहोचत आहेत. अभिनेत्री कतरिना कैफ पती विकी कौशलसोबत अर्पिताच्या घरी पोहोचली. ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कतरिना विकीचा हात हातात धरुन दिसत आहेत. दोघांनी पापाराझींना पोजही दिल्या. यावेळी कतरिना खूप आनंदी दिसली. तिने फिकट गुलाबी रंगाचा सूट परिधान केला होता, तर विकी कुर्ता पायजमामध्ये दिसला. व्हिडिओ पहा...

बातम्या आणखी आहेत...