आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट जोडी:कतरिना कैफ आणि विकी कौशल इंडियन टीव्हीवर पदार्पण करणार, स्पेशल गेस्ट म्हणून शोमध्ये होऊ शकतात सहभागी

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कतरिना आणि विकीने शोमध्ये येण्यास अद्याप होकार दिलेला नाही

बॉलिवूडची लोकप्रिय जोडी कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच एका टीव्ही शोमध्ये पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही लवकरच स्टार प्लसच्या 'स्मार्ट जोडी' या शोमध्ये कपल म्हणून दिसणार आहेत. शोचे निर्माते त्यांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. या शोद्वारे या जोडप्याचे भारतीय टेलिव्हिजनवर पदार्पण होणार आहे. त्याचबरोबर या दोघांनाही या शोमध्ये एकत्र आणून वाहिनीला भरपूर प्रसिद्धी मिळेल.

कतरिना आणि विकीने शोमध्ये येण्यास अद्याप होकार दिलेला नाही

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “शोच्या निर्मात्यांची 'स्मार्ट जोडी' या शोच्या सुरुवातीच्या भागात विकी-कतरिनाने सेलिब्रिटी पाहुणे म्हणून हजेरी लावावी अशी इच्छा आहे. जर विकी-कतरिना शोमध्ये पाहुणे म्हणून आले तर ही एक मोठी बाब असेल." मात्र, आतापर्यंत कतरिना आणि विकीने शोला होकार दिलेला नाही.

मनीष पॉल 'स्मार्ट जोडी' हा शो होस्ट करणार आहे. हा शो कन्नड शो 'इस्मार्ट जोडी'चा रिमेक आहे. या शोमध्ये नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा, राहुल महाजन-नताली, भाग्यश्री-हिमालय दासानी हे स्पर्धक म्हणून दिसणार आहेत. या शोमध्ये जोडप्यांना मजेदार गेम खेळावे लागतील.

विकी आणि कतरिना गेल्या वर्षी विवाहबद्ध झाले
कतरिना आणि विकीने मागील वर्षी 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट येथे लग्नगाठ बांधली. दोघे 2019 पासून एकमेकांना डेट करत होते. दोघांच्या वर्क फ्रंटबद्दल सांगियचे तर कतरिना लवकरच सलमान खानसोबत 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत 'फोन भूत'मध्ये दिसणार आहे.

विकी सध्या इंदूरमध्ये सारा अली खानसोबत त्याच्या आगामी 'प्रॉडक्शन नंबर 25' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. याशिवाय विकी लवकरच 'गोविंदा नाम मेरा', 'द ग्रेट इंडियन फॅमिली' आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या पुढील अनटाइटल चित्रपटात दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...