आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाचे विधी पार पडले असून दोघे लग्नाच्या गाठीत अडकले आहेत. मर्दाना महालासमोरील मोकळ्या बागेत दोघांनी सात फेरे घेतले. लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही खास पाहुणे उपस्थित होते. दुपारी 12 वाजता राजपूत थाटात लग्नाच्या विधींना सुरुवात झाली होती.
विंटेज कारमधून गडाच्या आत वरात काढण्यात आली. यानंतर विकी कौशल घोडीवर स्वार झाला होता. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास सप्तपदी व इतर विवाह विधी सुरू झाले होते. सायंकाळी 5.15 च्या सुमारास विधी पूर्ण झाले. फेरीनंतर विकी आणि कतरिनाने त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले.
दुपारी 4 वाजता अभिनेता अर्जुन कपूरही चौथ का बरवाडा येथील हॉटेलमध्ये पोहोचला आणि लग्नाला हजेरी लावली. त्याचवेळी अभिनेता अक्षय कुमार, सारा अली खान आणि आलिया भट्ट संध्याकाळी उशिरा पोहोचतील.
अर्जुन कपूर हॉटेल सिक्स सेन्समध्ये पोहोचला
लग्नात सहभागी होण्यासाठी अभिनेता अर्जुन कपूर हॉटेल सिक्स सेन्स फोर्टमध्ये पोहोचला आहे. अर्जुन हॉटेलबाहेर त्याच्या कारमध्ये दिसला होता.
सुरक्षेमुळे किल्ला काळ्या कपड्याने झाकण्यात आला होता
विकी वरात घेऊन कतरिना सध्या मुक्कामाला असलेल्या राणी पद्मावती महलासमोर पोहोचला होता. सुरक्षा रक्षकांनी राजवाडा आणि खिडक्या काळ्या कपड्याने झाकल्या आहेत, जेणेकरून कोणीही वधू-वरांचे फोटो, व्हिडिओ काढू नये.
मुलाच्या लग्नासाठी तयार होताना वीणा कौशल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.