आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकी-कॅट वेडिंग:राजपूत अंदाजात आज निघणार वरात, विटेंज कारमध्ये स्वार होणार विकी; 15 टन फुलांनी हॉटेलची सजावट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वराची एंट्री विंटेज कारने होईल

कतरिना कैफ आणि विकी कौशल आज विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नासाठी गाझीपूरहून 15 टन फुले किल्ल्यावर पोहोचली आहेत. गडाच्या आत आणि मंडपात सजावट सुरू आहे. लग्नविधींना नुकताच सुरू झाली आहे. 12 वाजता वरात गडाच्या आत प्रवेश करेल. सर्व व-हाडी राजपूत स्टाईलमध्ये साफा आणि शेरवानी परिधान केलेले असतील.

वराची एंट्री विंटेज कारने होईल
विंटेज कारमध्ये बसून विकी वरात घेऊन पोहोचेल. गुलाबपुष्पांचा वर्षावासह वरातीचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. मंडपाची सजावट राजेशाही पद्धतीने करण्यात आली आहे.

मर्दाना महालासमोर होतील सप्तपदी
फोर्ट सिक्स सेन्स फोर्टच्या मर्दाना महालासमोरील मोकळ्या बागेत विकी-कतरिना सात फेरे घेणार आहेत. त्यांच्यासाठी येथे मंडप सजवण्यात आला आहे. रिसेप्शन रात्री पूलसाइड होईल आणि आफ्टर पार्टी बॉलरूममध्ये होईल.

बुधवारी हळदी समारंभ व संगीत संपन्न
बुधवारी सकाळी 11 वाजता विकी-कतरिनाचा हळदी सोहळा पार पडला. दोघांनी हळदी समारंभात पिवळे कपडे परिधान केले होते. यानंतर दिवसभर पाहुण्यांची ये-जा फारशी नव्हती. हॉटेल सिक्स सेन्समध्ये संध्याकाळी 7 वाजता संगीत सोहळा झाला. संपूर्ण किल्ला रोषणाईने सजवण्यात आला होता.

लग्नपत्रिका दिवसभर व्हायरल झाली
लग्नात नो फोन पॉलिसी असताना सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित काही ना काही तरी व्हायरल होत आहे. विकी-कतरिना यांच्या नावाच्या लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल होत आहे. कतरिना कैफच्या फॅन पेजने हे कार्ड शेअर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...