आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा हळदी समारंभ पार पडला आहे. उद्या म्हणजेच 9 डिसेंबर रोजी दोघे लग्नाच्या गाठीत अडकणार आहे. तत्पूर्वी आज पार्टी आणि संगीत सोहळा होणार आहे. त्यामुळे हॉटेल सिक्स सेन्स फोर्टमध्ये पुन्हा पाहुण्यांची ये-जा सुरू झाली आहे.
रात्रीच्या जेवणानंतर आफ्टर पार्टी सुरू होईल. आजही अनेक मोठे सेलिब्रिटी हजेरी लावू शकतात. यामध्ये शाहरुख खान, करण जोहर, हृतिक रोशन, अनुष्का शर्मा, विराट कोहली आणि अक्षय कुमार यांच्या नावांचा समावेश आहे. ओमायक्रॉनच्या सावटामुळे विराट आणि अनुष्का मुलगी वामिकाविना लग्नाला येऊ शकतात, असे वृत्त आहे. सवाई माधोपूर येथील हॉटेल ताजमध्ये अक्षय कुमारच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर शाहरुख, विराट आणि हृतिकसाठी हॉटेल ओबेरॉयमध्ये बुकिंग आहे.
लग्नाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. अतिथी त्यांच्यासह मोबाईल फोन घेऊ शकणार नाहीत किंवा त्यांना सुरक्षा कोडशिवाय हॉटेलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. लग्नाच्या सुरक्षेसाठी 150 सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत. हॉटेलमध्ये फक्त आमंत्रित अतिथींनाच प्रवेश मिळेल.
विरुष्का वामिकाशिवाय लग्नात येऊ शकतात
क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा विकी-कतरिनाच्या लग्नाला उपस्थित राहू शकतात. पण विरुष्का त्यांची मुलगी वामिकाला लग्नाला आणणार नाहीत. ओमायक्रॉमुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. वामिकाच्या जन्मापासून विराट आणि अनुष्का यांनी पापाराझीपासून तिला दूर ठेवले आहे. त्यामुळे लग्नात मुलीला न आणण्याचे हेही कारण असू शकते.
लग्नपत्रिका व्हायरल होत आहे लग्नात नो फोन पॉलिसी असताना सोशल मीडियावर काही ना काही तरी व्हायरल होत आहे. आता विकी कतरिनाचे नाव असलेल्या लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल होत आहे. हे कार्ड कतरिना कैफच्या फॅन पेजने अकाउंटवर शेअर केले आहे.
फराहने पोस्ट केला डान्सचा व्हिडिओ चित्रपट निर्माता करण जोहर आणि कोरिओग्राफर फराह खान लग्नासाठी काल रात्री उशिरा सवाई माधोपूर येथील हॉटेल ताज येथे पोहोचले. त्यानंतर दोघांनीही हॉटेलच्या खोलीबाहेर 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाच्या गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या दोघांचा डान्स करतानाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.