आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकी-कॅट फर्स्ट व्हॅलेंटाईन:कतरिना कैफ विकी कौशलसोबत लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन डे साजरा करू शकणार नाही, जाणून घ्या काय आहे कारण?

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कतरिना मिड फेब्रुवारीत 'टायगर 3' च्या शेवटच्या शेड्यूलमध्ये असेल बिझी

गेल्या वर्षी 9 डिसेंबरला कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर दोघांनी ख्रिसमस, नवीन वर्ष एकत्र साजरा केला आहे. पण, लग्नानंतर हे नवविवाहित जोडपं त्यांचा पहिला व्हॅलेंटाईन डे एकत्र साजरा करू शकणार नाहीत, असे दिसते. याचे कारण म्हणजे सलमान खानच्या आगामी 'टायगर-3' या चित्रपटाचे शूटिंग याच काळात होणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, सलमान खान आणि कतरिना कैफ या वर्षी जानेवारीमध्ये 'टायगर 3' च्या शेवटच्या शेड्यूलचे शूटिंग करणार होते. मात्र, देशात कोविडची वाढती प्रकरणे पाहता निर्मात्यांनी दिल्लीचे वेळापत्रक रद्द केले. मात्र, आता 'टायगर 3'च्या निर्मात्यांनी त्यांच्या शेवटच्या शेड्यूलच्या तारखांवर पुन्हा काम केले आहे.

कतरिना मिड फेब्रुवारीत 'टायगर 3' च्या शेवटच्या शेड्यूलमध्ये असेल बिझी
निर्माते आता या महिन्याच्या मध्यात म्हणजे 10 ते 20 फेब्रुवारी दरम्यान चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलचे शूटिंग सुरू करण्याचा विचार करत आहेत. हे 15 दिवसांचे शेड्यूल असेल, ज्यामध्ये चित्रपटाचे चेस सीक्वेन्स शूट केले जातील. याच कारणामुळे कतरिना चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असेल त्यामुळे ती विकीसोबत लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन डे साजरा करू शकणार नाही.

दिल्लीच्या रस्त्यांवर शूट केले जाणार चित्रपटाचे काही अ‍ॅक्शन सीक्वेन्स
'टायगर 3'चे दिग्दर्शक मनीश शर्मा यांना चित्रपटाचे काही अ‍ॅक्शन सीन दिल्लीच्या रस्त्यावर शूट करायचे आहेत. सलमान आणि कतरिना लाल किल्ल्याभोवतीच्या लोकेशन्ससह शहरातील काही ऐतिहासिक ठिकाणीही चित्रपटाचे शूटिंग करणार आहेत. चित्रपट निर्माते हे सुनिश्चित करत आहेत की, प्रोडक्शन टीम शेड्यूल दरम्यान कठोर COVID सुरक्षा नियमांचे पालन करेल, जसे त्यांनी गेल्या 2 वर्षांत चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान केले आहे.

सलमान आणि कतरिना 12 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीला पोहोचू शकतात
सलमान खान आणि कतरिना कैफ 12 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीला पोहोचण्याची शक्यता आहे. येथे पोहोचल्यानंतर ते 14 फेब्रुवारीपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू करू शकतात. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, सलमान दिल्लीतील 15 दिवसांच्या शेड्युल आधी 5 फेब्रुवारीपासून चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करेल. सलमान मुंबईतील एका स्टुडिओमध्ये चित्रपटाचे काही सीन शूट करणार असल्याची माहिती आहे. कतरिना या सीन्सचा भाग असणार नाही.

सलमान-कतरिनाचे आगामी प्रोजेक्ट्स
'टायगर 3'मध्ये सलमान-कतरिनाशिवाय इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात इमरान नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. सलमान आणि इमरान पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाशिवाय सलमान जॅकलिन फर्नांडिससोबत 'किक 2' आणि पूजा हेगडेसोबत 'कभी ईद कभी दिवाली'मध्येही दिसणार आहे. दुसरीकडे, कतरिना 'फोन भूत', अली अब्बास जफरचा आगामी सुपरहिरो चित्रपट आणि श्रीराम राघवनच्या 'मेरी ख्रिसमस'मध्ये दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...