आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिनाचा श्रृंगार:कतरिनाने लग्नात घातला होता 17 लाखांचा लेहेंगा आणि 7.4 लाख रुपये किंमतीची अंगठी, हिऱ्याचे मंगळसूत्रही ठरले आकर्षण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विकीने लग्नात घातली होती आयवरी सिल्क शेरवानी

सवाई माधोपूर येथे 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकलेल्या कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा वेडिंग ड्रेस सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केला होता. जोडप्याचे लग्नातील फोटो समोर आल्यानंतर सब्यसाची यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर दोघांच्या ड्रेसची खासियतही सांगितली. कतरिनाने लग्नात घातलेला लेहेंगा 17 लाख रुपयांचा होता.

दुसरीकडे कतरिनाच्या मंगळसूत्रानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हे सब्यसाचीच्या बंगाल टायगर कलेक्शनमधील आहे. काळ्या आणि सोन्याच्या मोत्यांनी सजलेल्या कतरिनाच्या मंगळसूत्रात दोन छोटे हिरे आहेत.

कतरिना कैफने लग्नात सब्यसाचीच्या बंगाल टायगर कलेक्शनमधील मंगळसूत्र (डार्क सर्कलमध्ये) घातले आहे.
कतरिना कैफने लग्नात सब्यसाचीच्या बंगाल टायगर कलेक्शनमधील मंगळसूत्र (डार्क सर्कलमध्ये) घातले आहे.

कतरिनाच्या हातात दिसली सात लाखांची अंगठी
वधू कतरिनाचा लग्नातील लूक समोर येताच चाहत्यांनी तिच्या ज्वेलरीवर रिसर्च करायला सुरुवात केली. रिपोर्ट्सनुसार, कॅटने टिफनी ब्रँडची अंगठी घातली होती. त्याच्याभोवती एक मोठा नीलम आणि हिरे जडले होते. लक्झरी ब्रँड टिफनीच्या अधिकृत वेबसाइटवर त्याची किंमत 9800 डॉलर आहे, म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ती सुमारे 7,40,735 लाख आहे. विकीने त्याच ब्रँडचा प्लॅटिनम क्लासिक बँड घातला होता, ज्याची किंमत 1700 डॉलर म्हणजे सुमारे 1,28,580 लाख रुपये आहे.

चुडा आणि कलिरे हेही खास
कतरिनाच्या हातात दिसणार्‍या साध्या लाल बांगड्या राब्ताच्या आहेत. ज्याची डिझाइन राहुल लुथरा यांनी केली आहे. कतरिनासाठी त्यांनी क्लासिक चुडा निवडला होता. दुसरीकडे, कॅटचे ​​कलिरे हे मृणालिनी चंद्रा यांनी राहुलसोबत मिळून तयार केले आहे.

सब्यसाचीचे ब्राइडल कलेक्शन ऑगस्टमध्ये लाँच करण्यात आले होते
सब्यसाचीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या जोडप्याच्या वेडिंग आउटफिटचे वर्णन शेअर केले आहे. त्यांनी लिहिले, 'वधू कॅटने हाताने विणलेल्या मटका सिल्कमध्ये क्लासिक सब्यसाची लाल रंगाचा ब्राइडल लेहेंगा घातला आहे. या लेहेंग्यात टील वर्क आणि मखमली एम्ब्रॉयडरी असलेली रिव्हायव्हल जरदोजी बॉर्डर आहे. वर विकी कौशलच्या पंजाबी चालीरीती लक्षात घेऊन, कतरिनाची ओढणी हाताने बनवलेल्या चांदीच्या रेयॉनसह इलेक्ट्रोप्लेटेड सोन्यामध्ये कस्टम-ट्रिम केलेली आहे. यासह हेरिटेज दागिने घातले.'

विकीने लग्नात घातली होती आयवरी सिल्क शेरवानी
सब्यसाचीने वर विकी कौशलबद्दल लिहिले की, 'त्याने एक आयवरी सिल्क शेरवानी घातली होती, ज्यावर अतिशय कठीण अशी एम्ब्रॉयडरी केलेली होती. या शेरवानीसह त्याने सिल्कचा कुर्ता आणि चुरीदार पायजामा घातला होता. शेरवानीला सोन्याचा मुलामा असलेली बंगाल टायगर बटणे आहेत. शॉल टसर जॉर्जेटची आहे, त्यावर जरी मरोरी नक्षीदार पल्लू आणि बॉर्डर आहे. विकीने गोल्डन बनारसी सिल्कचा साफा बांधला होता. सब्यसाची हेरिटेज ज्वेलरीमधून 18 कॅरेट सोन्यातील पन्ना, शानदार कट आणि गुलाब कट हिरे, क्वार्ट्ज आणि टर्मलाइनने जडलेला किलंगी (कलगी) आणि स्टेटमेंट नेकलेसही घातला होता. '

बातम्या आणखी आहेत...