आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफवा:कतरिना कैफ आणि विकी कौशलने गुपचुप साखरपुडा उरकल्याच्या अफवांना पूर्णविराम, बातमी व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीच्या टीमने दिले स्पष्टीकरण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे नाव गेल्या काही महिन्यांपासून विकी कौशलसोबत जोडले जात आहे. इतकेच नाही तर अलीकडेच या दोघांनी गुपचुप साखरपुडा उरकल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. साखरपुड्यासोबच दोघांचा रोकादेखील झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांची काही छायाचित्रेदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यात दोघेही ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दिसत आहेत. साखरपुडा आणि रोकाचे वृत्त व्हायर झाल्यानंतर आता कतरिना कैफच्या टीमकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

कतरिना कैफच्या प्रवक्त्याने झूमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कतरिना आणि विकी यांचा साखरपुडा किंवा रोका सेरेमनी झालेली नाही. 'कोणताही रोका झालेला नसून कतरिना लवकरच टायगर 3 च्या शूटसाठी रवाना होत आहे,' असे कतरिनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चांना उधाण आले आहे. विरल भयानीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सांगितले होते की, ‘विकी आणि कतरिना यांनी साखरपुडा केल्याची अफवा आहे. दोघांची रोका सेरेमनीदेखील झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीय तोपर्यंत, ही अफवा समजावी,’ या आशयाचे ट्वीट विरलने केले आहे. त्याचे हे ट्वीट चर्चेत होते. पण आता सर्व पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहेत.

विरल भयानीने स्पष्ट केले की, आज (बुधवारी) दुपारी कतरिना कैफच्या टीमकडून मला कॉल आला होता आणि त्यांनी स्पष्ट केले की, सर्व वृत्त अफवा आहेत. त्यामुळे आम्ही सर्व इंस्टाग्राम पोस्ट डिलीट केल्या आहेत.

सोशल मीडियावर विकी कौशल आणि कतरिनाचा एक जुना फोटो चांगलाच व्हायरल होवू लागला होता. या फोटोत कतरिनाने लाल लहेंगा परिधान केल्याचे दिसत आहे. तर विकी कौशलने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला आहे. या फोटोमुळे कतरिना आणि विकीचा साखरपुडा झाल्याच्या चर्चांना उधाण आले होतं. मात्र हा फोटो 2019 मधील असून अनिल कपूरने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीचा आहे.

विकी आणि कतरिना एकत्र आहेत आणि हे खरे आहे: हर्षवर्धन

काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन कपूरने विकी आणि कतरिना डेट करत असल्याचे म्हटले होते. एका मुलाखतीत हर्षवर्धनला विचारण्यात आले होते की, बॉलिवूडमधल्या कोणत्या कलाकार जोडीच्या अफेअरच्या चर्चांना तू खरे मानतो तसेच अशा कोणत्या जोड्या आहेत ज्या फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठी आहेत? या प्रश्नाचे उत्तर देताना हर्षवर्धन म्हणाला, 'विकी आणि कतरिना एकत्र आहेत आणि हे खरे आहे.' त्यानंतर बावचळून पटकन म्हणाला, 'हे सांगून मी कोणत्या अडचणीत तर सापडणार नाहीये ना?'

अलीकडेच विकी कौशल आणि कतरिना कैफ शेरशाह या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला एकत्र पोहोचले होते. वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास कतरिना कैफ अक्षय कुमारसोबत ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत ती 'फोन भूत'मध्येही दिसेल. सलमान खानसोबतचा 'टायगर 3' हा तिचा आणखी एक आगामी चित्रपट आहे. याच्या शूटिंगसाठी लवकरच ती रशियाला रवाना होणार आहे. तर विकी कौशल 'द इम्मोर्टल अश्वत्थामा', 'सरदार उधम सिंग', 'सॅम मानेकशा'या चित्रपटांत झळकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...