आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवूड ऑन ट्रॅक:कतरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या 'फोनभूत'चा फर्स्ट लूक आला समोर आला, 2021 मध्ये रिलीज होणार हॉरर कॉमेडी 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'फोनभूत'चे दिग्दर्शन गुरमीत सिंग करत आहेत.

कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'फोनभूत' या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाला आहे. 'फोनभूत' या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या पोस्टरवर हे तिघेही एका कॉल सेंटरच्या वर्करच्या ड्रेसमध्ये दिसले आहेत. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना कतरिनाने लिहिले आहे - भूतांशी संबंधित प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी एक दुकान. आपल्यापर्यंत 2021 मध्ये पोहोचेल.

  • वर्षाच्या शेवटी शुटिंग सुरू होईल

'फोनभूत'चे दिग्दर्शन गुरमीत सिंग करत आहेत. तर निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांची आहे. सुपरनॅचरल पॉवर्सची ही कहाणी रवी शंकरन यांनी लिहिली आहे. चित्रपटाची शूटिंग 2020 च्या उत्तरार्धात सुरू होईल, तर 2021 मध्ये चित्रपट प्रदर्शित होईल. चित्रपटाची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली होती. या चित्रपटाशिवाय कतरिना कैफचा पुढील चित्रपट म्हणजे 'सूर्यवंशी'. तर ईशान खट्टर 'खाली-पीली'मध्ये दिसणार आहे. सिद्धांत चतुर्वेदी 'बंटी आणि बबली 2' मध्ये दिसणार आहे.

  • अद्याप चित्रपटांचे शुटिंग सुरू झालेले नाही

एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत आता फक्त टीव्ही शोचे शूटिंग सुरू झाले आहे. अद्याप चित्रपटांच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झालेला नाहीये. काही चित्रपटांचे पोस्ट प्रोडक्शन सुरु आहे.  बच्चन कुटुंबाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर कोणताही अभिनेता किंवा प्रोडक्शन हाऊस आपला जीव धोक्यात घालण्यास तयार नाही. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या 3 लाखांहून अधिक आहे. तर संक्रमणामुळे आपला जीव गमावणा-यांची संख्या 11 हजार 854 झाली आहे.