आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिनाच्या भावाला डेट करतेय इलियाना:करण जोहरने दिला नात्याला दुजोरा, मालदीवच्या व्हेकेशनला सिबॅस्टियनसोबत दिसली होती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने अलीकडेच त्याचा टॉक शो 'कॉफी विथ करण 7' मध्ये अभिनेत्री इलियाना डिक्रूझ आणि कतरिना कैफचा भाऊ सिबॅस्टियन लॉरेन मायकल एकमेकांना डेट करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. इलियाना याआधी ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँड्र्यू नीबोनला डेट करत होती, पण 2020 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.

इलियाना-सिबॅस्टियन पहिल्यांदा करणसमोरच भेटले
कॉफी विथ करणच्या आगामी भागात कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर खास पाहुणे म्हणून पोहोचले होते. यादरम्यान करणने कतरिनाला सांगितले की, 'इलियाना डिक्रूझचे तुझ्या कुटुंबाशी जवळचे नाते आहे, याबाबत वेगळे काही सांगायला नको. मालदीवच्या सहलीचे काही फोटो समोर आले होते, जे मी पाहिले होते. ते पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले की, या दोघांची भेट तर माझ्यासमोरच पार्टीत झाली होती.'

कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त इलियाना-सिबेस्टियन मालदीवला गेले होते
कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त इलियाना-सिबेस्टियन मालदीवला गेले होते

करण पुढे म्हणाला, 'हे सर्व फार लवकर घडले आहे.' या गोष्टी ऐकल्यानंतर कतरिना हसली आणि म्हणाली की तिलाही तिच्या आजूबाजूला खूप काही दिसत आहे.

इलियानाने अद्याप तिचे नाते अधिकृत केले नाही
झाले असे की, 16 जुलै रोजी कतरिनाच्या वाढदिवसाचे काही फोटो समोर आले होते. त्यात विकी, कतरिना, इलियाना डिक्रूझ, सिबॅस्टियन, इसाबेल कैफ, आनंद तिवारी आणि मिनी माथूर होते. कतरिनाच्या पार्टीत इलियाना आणि सिबॅस्टियनला एकत्र पाहून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले. इतकेच नाही तर मालदीवहून परतताना इलियाना आणि कतरिना कैफचा भाऊ एकत्र विमानतळावर स्पॉट झाले होते. मात्र दोघांनी अद्याप हे नाते अधिकृत केले नाही.

2012 मध्ये इलियानाने केले होते बॉलिवूडमध्ये पदार्पण
इलियानाने 2012 मध्ये अनुराग बासूच्या 'बर्फी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती 'मैं तेरा हीरो', 'रुस्तम' आणि 'रेड' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. याशिवाय तिने साऊथच्या 'पोकिरी', 'किक', 'जुलाई' आणि 'केडी' सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केले आहे. तर सिबॅस्टियन हा यूकेमध्ये राहणारा मॉडेल आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफचा भाऊ आहे.

बातम्या आणखी आहेत...