आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रिटी मेहंदी आर्टिस्टची कहाणी:कतरिना कैफपासून ते अंबानी कुटुंबातील प्रत्येक लग्नापर्यंत, वीणा नागदा आहेत सेलिब्रिटींची आवडत्या मेंहदी आर्टिस्ट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमिताभपासून ते दीपिकापर्यंत वीणा यांचे क्लायंट

7 डिसेंबर रोजी कतरिना कैफ हिच्या हातावर मेहंदी लावली गेली. विकी कौशलसोबत 9 डिसेंबर रोजी कतरिना विवाहबद्ध होणार आहे. कतरिनाच्या हातावर गुजराती आर्टिस्ट वीणा नागदा यांनी मेहंदी काढली आहे. वीणा यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत त्या एका बिग फॅट वेडिंगचा भाग होत असल्याचे सांगितले आहे. यानिमित्ताने जाणून घेऊयात सेलिब्रिटींची पहिली पसंती असलेल्या वीणा नागदा यांच्याविषयी...

वीणा यांची सोशल मीडिया पोस्ट
वीणा यांची सोशल मीडिया पोस्ट

मेहंदी आर्टिस्ट वीणा नागदा यांन अंबानीपासून ते कपूर कुटुंबीयांच्या लग्नात बघितले गेले आहे. त्यांच्या बाबतीत खास गोष्ट ही की, त्यांनी श्रीदेवी, सोनम कपूरची आई सुनीता कपूर यांच्यापासून ते बॉलिवूडच्या प्रत्येक अभिनेत्रीच्या हातावर मेहंदी काढली आहे. देशातच नव्हे तर परदेशातही वीणा यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वीणा यांना जगात सर्वात जलद गतीने मेहंदी काढण्यासाठी पुरस्कारही मिळाले आहेत.

30 वर्षांपासून मेहंदी डिझायनर म्हणून काम करतात वीणा
वीणा यांचा जन्म मुंबईतील एका गुजराती कुटुंबात झाला होता. पाच बहिणीत त्या सर्वात लहान आहेत. त्यांच्या आई गृहिणी तर वडील पुजारी होते. वीणा यांना दहावीपुढे शिकण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांनी घरी राहूनच काही तरी नवीन करण्याचा विचार केला. त्यांनी स्वतः मेहंदी शिकायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली.

वीणा ब्राइडल मेहंदीमध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांना नेल पॉलिश, शेडेड, हीरा-मोती, जरदोजी, अरेबिक, ब्लॅक मेहंदी, स्टोन अँड डायमंड मेहंदीसाठी ओळखले जाते. याच आर्टमुळे त्यांचे विदेशातही चांगले नाव झाले आहे.

2000 मध्ये हृतिक-सुझानच्या लग्नात वीणा याच मेहंदी आर्टिस्ट होत्या.
2000 मध्ये हृतिक-सुझानच्या लग्नात वीणा याच मेहंदी आर्टिस्ट होत्या.

पूनम ढिल्लन होत्या पहिल्या सेलिब्रेटी कस्टमर
वयाच्या 17 व्या वर्षीपासून वीणा यांनी मेहंदीला करिअर बनवले. त्यांनी ट्रेनिंग सेंटरही उघडले आणि मग मागे वळून पाहिले नाही. छोट्या वयातच त्यांचे नाव झाले आणि 1988 मध्ये त्यांना अभिनेत्री पूनम ढिल्लन यांच्या हातावर मेहंदी काढण्याची संधी मिळाली. अशा प्रकारे पूनम या त्यांच्या पहिल्या सेलिब्रिटी क्लाएंट होत्या. पण वीणा यांनी प्रसिद्धी हृतिकच्या लग्नात मिळाली. त्यांच्या लग्नातही वीणा यांनीच मेहंदी लावली होती.

दीपिकाच्या लग्नात वीणा यांनीच तिच्या हातावर मेहंदी काढली होती.
दीपिकाच्या लग्नात वीणा यांनीच तिच्या हातावर मेहंदी काढली होती.

अमिताभपासून ते दीपिकापर्यंत वीणा यांचे क्लायंट
वीणा यांची लोकप्रियता इतकी आहे की, राणी मुखर्जी, काजोल, शिल्पा शेट्टीपासून ते करीना कपूर, ऐश्वर्या राय, आशा भोसले, डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित, जया प्रदा, एकता कपूर, टीना अंबानीसहत अनेक बिझनेसमॅनच्या पत्नी आणि मुली त्यांच्याकडून मेहंदी लावून घेणे पसंत करतात. वीणा यांना करण जोहरने बॉलिवूडची मेहंदी क्वीन या नाव दिले आहे.

परदेशात आहेत वीणा यांचे क्लाएंट्स
वीणा नागदा यांचे क्लाएंट्स फक्त बॉलिवूड किंवा भारतात नाहीत तर विदेशातही आहेत. बेल्जियम, लंडन, मॉरेशियस, पेरिस, सिंगापूर आणि यूएसएमधेही वीणा यांचे क्लायंट्स आहेत.

एका जाहिरातीसाठी आलियाला वीणा यांनी मेहंदी लावली होती.
एका जाहिरातीसाठी आलियाला वीणा यांनी मेहंदी लावली होती.

अनेक चित्रपटांमध्ये दिसल्या वीणा यांच्या मेहंदी डिझाइन्स
वीणा यांनी तयार केलेल्या मेहंदी डिझाइन्स 'कभी खुशी कभी गम', 'कल हो ना हो', 'मेरे यार की शादी है', 'ये जवानी है दीवानी' आणि 'पटियाला हाउस' यासह अनेक चित्रपटांमध्ये दिसल्या आहेत. या चित्रपटांमधील लग्नाच्या दृश्यात अभिनेत्रींच्या हातावर दिसणारी मेहंदी डिझाइन्स या वीणा यांनीच तयार केल्या होत्या.

55 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना दिले मेहंदीचे धडे

वीणा यांची खास गोष्ट ही आहे की, ब्राइडल, अरेबिक, हीरा-मोती, स्टोन-मेहंदी, डायमंड या मेंहंदी लावण्यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. मुंबईमध्ये त्यांचे इन्स्टिट्यूट देखील आहे जिथे मेहंदीचा प्रोफेशनल कोर्स करून घेतला जातो. आतापर्यंत त्यांनी 55 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मेहंदीच्या कलेत ट्रेंड केले आहे.

2019 कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेट लुकसाठी सोनमने वीणा नागदा यांच्याकडून मेहंदी लावली होती.
2019 कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेट लुकसाठी सोनमने वीणा नागदा यांच्याकडून मेहंदी लावली होती.

सेलिब्रिटी वेडिंगमध्ये मेहंदीसाठी पैसे मागत नाहीत
वीणा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जे सेलिब्रिटी त्यांना लग्नात मेहंदी लावण्यासाठी आमंत्रित करतात, त्यांना ते आपले मानधन सांगत नाहीत. सेलिब्रिटी त्यांच्या मर्जीने त्यांना मानधन देत असतात. सहसा वीणा मेहंदीसाठी 15 ते 25 हजार रुपयांपर्यंत मानधन घेतात. याशिवाय मेहंदीच्या डिझाइननुसार पैसे कमी जास्त होतात.

बातम्या आणखी आहेत...