आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोया अख्तरच्या पार्टीत प्रेमात पडले होते कतरिना-विकी:कॉफी विथ करणमध्ये कतरिना म्हणाली - विकी माझ्या नशिबात होता

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोच्या आगामी भागात 'फोन भूत' या चित्रपटातील कलाकार कतरिना कैफ, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांनी हजेरी लावली. कतरिनाने शोमध्ये विकी कौशलसोबतचे तिचे नाते आणि लव्ह स्टोरी सांगितली. कतरिनाने सांगितले की, विकीच्या आयुष्यात येणे माझ्या नशिबात होते.

विकीच्या उंचीने प्रभावित झाली होती कतरिना
कतरिना आणि विकीच्या नात्याबद्दल बोलताना करण म्हणाला, "हे कसे घडले... जेव्हा तू शोमध्ये आली होती तेव्हा तू म्हणाली होती की, 'माझी जोडी विकी कौशलसोबत चांगली वाटते आहे'.' यावर करणला थांबवत ती म्हणाली, होय मला आठवतंय की मी असे म्हटले होते. कारण मला त्याची उंची आवडली होती, असे कतरिना म्हणाली.

विकी-कतरिनाचे लग्न 9 डिसेंबर 2021 रोजी झाले होते.
विकी-कतरिनाचे लग्न 9 डिसेंबर 2021 रोजी झाले होते.

कतरिनाने सांगितली तिची प्रेमकहाणी
करणने प्रश्न विचारला की, ही प्रेमकहाणी कशी सुरू झाली? यावर कतरिना म्हणते, "आमची कहाणी खूप मजेदार आहे, कारण सोशल मीडियावर माझ्या आणि विकीच्या डेटिंगबद्दल बरेच काही लिहिले जात होते. पण आम्ही तोपर्यंत डेटिंग करत नव्हतो आणि आमच्या दोघांसाठी हे खूप विचित्र होते. तोपर्यंत आम्ही फक्त भेटलो होतो. फक्त एकदाच आणि मला त्याच्याबद्दल फारशी माहितीही नव्हती," असा खुलासा कतरिनाने केला.

विकीचे येणे माझ्या नशिबात होते - कतरिना
विकीसोबतचे आपले नाते अनपेक्षित असल्याचे सांगताना कतरिना म्हणाली, "हे खरेच माझे नशीब होते. असे अनेक कोइंसिडेंट घडले की एक वेळ अशी आली जेव्हा आम्हा सर्वांना सर्वकाही अनरिअल वाटू लागले होते." कतरिनाने सांगितले की, तिने पहिल्यांदा दिग्दर्शक झोया अख्तरला विकी कौशलबद्दल सांगितले. झोयाच्या पार्टीतच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

विकीने कतरिनाला दिले होते वाढदिवसाचे सरप्राईज
कतरिना कैफ जुलैमध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पती विकी कौशलसोबत मालदीवला गेली होती. कतरिनाने विकीच्या सरप्राईज कॉन्सर्टबद्दल सांगितले की, "त्याने माझ्या प्रत्येक गाण्याचा 45 मिनिटांचा कॉन्सर्ट केला आणि सर्व गाण्यांवर डान्स केला. आम्ही सुमारे 17-18 लोक होतो आणि सर्वजण नाचणे थांबवून त्याला पाहू लागले. मला असे वाटले, 'त्याला सर्व काही कसे ठाऊक असते?,' असे कतरिना म्हणाली.

बातम्या आणखी आहेत...