आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिला गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली. तेव्हापासून ती घरीच क्वारंटाइन आहे. रविवारी कतरिनाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून ती या आजारातून आता बरी होत आहे.
सोशल मीडियावर स्वतःचे दोन फोटो शेअर करत कतरिनाने त्याला 'काळ आणि संयम' असे कॅप्शन दिले आहे. या फोटोत कतरिना रुममध्ये बसलेली असून नो मेकअप लूकमध्ये दिसतेय. कतरिनाच्या या फोटोला तासाभराच्या आता पाच लाखांहून अधिक लाइक्स आले आहेत. सोबतच चाहते ती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना देखील करत आहेत.
गेल्या आठवड्यात कतरिनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. कतरिनाने लिहिले होते, 'माझी कोविड 19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतःला आयसोलेट केले असून होम क्वारंटाइन आहे आणि सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे.' सोबतच संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुण घेण्याचे आवाहन तिने केले होते. चाहत्यांना स्वतःची काळजी घ्या, असेही ती म्हणाली होती.
यापूर्वी अनेक सेलिब्रिटी अडकले कोरोनाच्या विळख्यात
कतरिनाचा तथाकथित बॉयफ्रेंड विकी कौशललादेखील कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय भूमी पेडणेकर, रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट, आमिर खान, आर माधवन, परेश रावल, मिलिंद सोमण, रोहित सराफ, सिद्धांत चतुर्वेदी, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन आणि सतीश कौशिक, फातिमा सना शेख, आदित्य नारायण आणि त्याची पत्नी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, आर. माधवन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कोरोनावर यशस्वी मात देखील केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.