आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल कॉज:कतरिना कैफने फोटो शेअर केला आणि लिहिले- आय एम फातिमा, घरगुती हिंसा पीडितांसाठी निधी उभारण्यासाठी देतेय पाठिंबा 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कतरिनासह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी स्नेहा या स्वयंसेवी संस्थेला पाठिंबा दिला आहे.

कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याच्या माध्यमातून तिने स्नेहा या हिंसाचारग्रस्तांसाठी काम करणार्‍या संस्थेला मदतीचा हात दिला आहे. कतरिनाने तिच्या फोटोसह एक नाव लिहिले आहे - आय एम फातिमा. निधी उभारणीस मदत करण्यासाठी तिने जान्हवी कपूर, आलिया भट्ट आणि तब्बू यांनाही नॉमिनेट केले आहे.

स्नेहा स्वयंसेवी संस्था गेली 20 वर्षे मुंबईत कार्यरत आहेत. हिंसाचाराच्या वाढत्या घटनांमुळे संस्थेला निधी आणि संसाधनांचा अभाव आहे. त्यामुळे कतरिनाने त्यांच्या मदतीसाठी ही मोहीम सुरू केली आहे. यासाठी, आपल्याला स्नेहाच्या अधिकृत  पेजवरुन एक नाव निवडावे लागेल आणि ते आपल्या फोटोसह शेअर करावे लागेल आणि दिलेल्या लिंकवर देणगी द्यावी लागेल. या संस्थेला मदत करत असताना कतरिनाने आपल्या फोटोवर फातिमा हे नाव लिहून पोस्ट शेअर केली आहे.

याबरोबरच या कामात मदत करण्यासाठी तिने बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही नामांकित केले आहे. कतरिनाने तब्बू, जान्हवी कपूर आणि आलिया भट्ट यांना टॅग केले आहे. यापूर्वी शबाना आझमी, श्रुती हासन, ईशा देओल, अभिषेक बच्चन, मलायका अरोरा, करिश्मा कपूर, शिल्पा शेट्टी, बिपाशा बासू, दीया मिर्झा आणि कल्की कोचलीन यांनीही स्नेहाच्या पाठिंब्यासाठी आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...