आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकी-कतरिना वेडिंग:लग्नाच्या तयारीसाठी कतरिनाने घेतला कामातून ब्रेक, विकी कौशल अद्याप चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 7 ते 12 डिसेंबर दरम्यान होईल लग्न

अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सूर्यवंशी' या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. याशिवाय तिचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत आहे. येत्या डिसेंबरमध्ये कतरिना अभिनेता विकी कौशलसोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे. कतरिना-विकीने यावर अद्याप मौन बाळगले आहे. दरम्यान कतरिनाने लग्नाच्या तयारीसाठी कामातून ब्रेक घेतल्याच्या बातम्या आता येत आहेत. लग्नानंतर ती काही जाहिराती आणि कार्यक्रमांसाठी शूट करणार आहे, पण सध्या तिचे सगळे लक्ष लग्नाच्या तयारीवर आहे.

विकी शूटिंग करत आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल अजूनही प्रोफेशनल कमिटमेंटमध्ये व्यस्त आहे. लग्नाच्या काही दिवस आधी या अभिनेत्याने लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान दिसणार आहे. अशा परिस्थितीत त्याचा भाऊ सनी कौशल आणि त्याची आई त्याच्या कुटुंबाच्या वतीने लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. लग्नाच्या तयारीत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून कतरिना या दोघांच्या संपर्कात आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशल गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
कतरिना कैफ आणि विकी कौशल गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

7 ते 12 डिसेंबर दरम्यान होईल लग्न
सवाई माधोपूरच्या चौथ, बरवाडा येथील सिक्स सेंस बरवाडा फोर्ट हॉटेलमध्ये विकी आणि कतरिना विवाहबद्ध होणार आहेत. 7 ते 12 डिसेंबर या कालावधीत सर्व कार्यक्रम होणार आहेत. यासाठी हॉटेलचे बुकिंग आधीच झाले आहे. मात्र त्याची औपचारिक घोषणा अजून व्हायची आहे. हॉटेलनेही या व्हीआयपी लग्नाची तयारी सुरू केली आहे.

अनेक सेलिब्रिटी येतील
विकी आणि कतरिनाचा विवाहसोहळा छोटा असेल. असे असूनही या कार्यक्रमाला अनेक मोठे स्टार्स येण्याची शक्यता आहे. लग्नाचा मुख्य कार्यक्रम जनाना महलमध्ये होणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...