आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिना-विकीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस:विकी म्हणाला- माझे तुझ्यावर एवढे प्रेम ज्याची तू कल्पनाही करू शकत नाहीस

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे कतरिना कैफ आणि विकी कौशल आज (9 डिसेंबर) त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. या खास निमित्ताने या कपलने त्यांच्या लग्नाचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोंमध्ये कतरिना आणि विकी एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत.

हे फोटो शेअर करत कतरिना कैफने लिहिले, 'माझे प्रकाश किरण हॅपी वन इयर.'

कतरिना-विकी 2021 मध्ये राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट येथे विवाहबद्ध झाले.
कतरिना-विकी 2021 मध्ये राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट येथे विवाहबद्ध झाले.
दोघांच्या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
दोघांच्या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

विकीने रोमँटिक कॅप्शन लिहिले
कतरिनासोबतचे काही फोटो शेअर करत विकीने कॅप्शनमध्ये लिहिले, 'वेळ पाखरासारखा उडून जातो, पण माझे प्रेम तुझ्यासोबत ही वेळ जादुई पद्धतीने उडून जातेय. लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन. मी तुझ्यावर एवढे प्रेम करतो, ज्याची तू कधी कल्पना करू शकत नाही.'

लग्नाआधी दोघांनी एकमेकांना खूप दिवस डेट केले होते.
लग्नाआधी दोघांनी एकमेकांना खूप दिवस डेट केले होते.
या फोटोमध्ये कतरिना पती विकीसोबत खूप आनंदी दिसत आहे.
या फोटोमध्ये कतरिना पती विकीसोबत खूप आनंदी दिसत आहे.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त विकीने केला भांगडा
कतरिना आणि विकी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस मुंबईबाहेर साजरा करत आहेत. यादरम्यान कतरिनाने पती विकीचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आनंदाने भांगडा करताना दिसत आहे.

कतरिना-विकी 2019 पासून एकमेकांना डेट करत होते
कतरिना आणि विकीने गेल्या वर्षी 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट येथे लग्नगाठ बांधली. दोघे 2019 पासून एकमेकांना डेट करत होते. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कतरिना लवकरच सलमान खानसोबत 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. तर विकी 'सॅम बहादूर', 'गोविंदा नाम मेरा' आणि 'द ग्रेट इंडियन फॅमिली'मध्ये दिसणार आहे.

  • विकी-कॅट वेडिंग:एकत्र एकही चित्रपट केला नाही, मग विकी-कतरिना एकमेकांच्या प्रेमात कसे पडले? जाणून घ्या या नात्याची कहाणी

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहेत. दोघे 9 डिसेंबरला हॉटेल सिक्स सेन्से बरवारा फोर्टमध्ये लग्न करणार आहेत. मात्र, दोघांनीही या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. कतरिना आणि विकीची लव्हस्टोरी खूप रंजक आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल:-

  • विकी-कतरिनाचा लग्नाचा पहिला वाढदिवस असेल खास:मालदीवमध्ये एकत्र घालवणार वेळ, एकमेकांना देणार खास सरप्राइज

बॉलिवूडचे लोकप्रिय कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल येत्या 9 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. दरम्यान, कतरिना आणि विकीच्या अ‍ॅनिव्हर्सरी प्लॅनचा खुलासा झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा दिवस खास बनवण्यासाठी दोघेही मालदीवला जाणार आहेत. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...