आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकी-कॅट वेडिंग:कतरिनाने सासरे श्याम कौशलसोबत अनेक चित्रपटांमध्ये सोबत केले आहे काम, 'फँटम'मध्ये मशीनगन वापरण्यावरून झाला होता दोघांत वाद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विकी-कॅटने मोठ्या पडद्यावर एकत्र काम केलेले नाही

अभिनेता विकी कौशलने कधीही कतरिनासोबत स्क्रीनवर किंवा ऑफ स्क्रीनवर काम केले नसले तरी कॅटचे ​​सासरे श्याम कौशल यांनी त्यांच्या सुनेसोबत अनेकदा काम केले आहे. श्यामकौशल हे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टंट दिग्दर्शक आहेत आणि त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये कॅटचे स्टंट सीन्स कॉर्डिनेट केले होते.

विकी-कॅटने मोठ्या पडद्यावर एकत्र काम केलेले नाही
या दोघांना एखाद्या चित्रपटात एकत्र काम करण्याची ऑफर आली नाही असे नाही. कतरिना कैफला 2018 मध्ये आलेल्या रणबीर कपूर स्टारर 'संजू'मध्ये रोल ऑफर करण्यात आला होता. विकी या चित्रपटात झळकला होता. पण कॅटने ऑफर नाकारली होती. रिपोर्ट्सनुसार, श्याम कौशल यांनी क्रिश, गँग्स ऑफ वासेपूर, कमिने, जब तक है जान, धूम 3 आणि फँटम सारख्या चित्रपटांसाठी स्टंट डायरेक्ट केले आहेत.

एका चित्रपटात कतरिना लपवू इच्छित होते श्याम
रिपोर्ट्सनुसार, श्याम कौशल यांना 2015 मध्ये आलेल्या कबीर खानच्या 'फँटम' चित्रपटातील एका सीक्वेन्समध्ये कतरिनाला लपवायचे होते. पण कतरिनाने तिचा सीक्वेन्स स्वतः पूर्ण केला होता. कतरिनाने श्याम यांच्यासोबत काम करणे हा एक दुर्मिळ क्षणच म्हणावा लागेल. दुसरीकडे टेपकास्ट सीझन 2 या चॅट शोमध्ये कतरिना आणि विकी एकत्र कॅमे-यासमोर दिसले होते.

बातम्या आणखी आहेत...