आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो मोबाइल वेडिंग:विकी-कतरिनासोबत सेल्फी घेऊ शकणार नाहीत पाहुणे, लग्नात पाहुण्यांसाठी डिक्टेट जारी करणार कपल

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विकी आणि कतरिना लग्नाच्या ठिकाणी पाहुण्यांसाठी नो मोबाइल डिक्टेट लागू करतील.

विकी कौशल आणि कतरिना कैफचा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विवाहबद्ध होणार आहेत. मात्र या लग्नात पाहुण्यांना मोबाईल फोनसाठी परवानगी दिली जाणार नाही. विकी आणि कतरिना लग्नाच्या ठिकाणी पाहुण्यांसाठी नो मोबाइल डिक्टेट लागू करतील. इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीला त्यांच्या परवानगीशिवाय कोणताही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर दिसणार नाही याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.

हे लग्न राजस्थानमधील एका आलिशान फोर्ट-रिसॉर्टमध्ये होत असल्याची माहिती आहे. विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही किंवा अद्याप कोणतेही निमंत्रण पत्रिका समोर आलेली नाही. त्यामुळे हे जोडपं आपलं लग्न पूर्णपणे गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

सोशल मीडियावर एकही फोटो लीक होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार
दोघांच्या एका निकटवर्तीयाच्या म्हणण्यानुसार- "दोघांसाठी हा खूप मोठा दिवस आहे, त्यामुळे त्यांच्या नकळत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ लीक होऊ नयेत यासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. कतरिना आणि विकीच्या लग्नाच्या तयारीसाठी गोपनीयता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एक मोठी टीम तयार करण्यात आली आहे."
वेडिंग लूक कॅप्चर करु शकणार नाही
वृत्तानुसार, कार्यक्रमाच्या ठिकाणी एक ठराविक क्षेत्र असेल जिथे कोणीही मोबाईल फोन वापरू शकणार नाही. ए-लिस्टर बॉलिवूड सेलिब्रिटींशिवाय दोघांचे कुटुंबीयही अनेकांना आमंत्रित करत आहेत. त्यामुळे लग्नाच्या ठिकाणापासून फोन दूर ठेवण्याचे हे धोरण सर्वांना लागू होणार आहे.

दीपिका-प्रियांका यांनीही हीच पॉलिसी ठेवली होती
सेलिब्रिटींच्या वेडिंग व्हेन्यूवर मोबाइल फोनवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनीही त्यांच्या लग्नाच्या वेळी काही भागात पाहुण्यांचे फोन सिक्योरिटी जवळ ठेवले होते. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनीही त्यांच्या लेक कोमोच्या वेडिंगमध्ये त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबियांना मोबाइल फोन आणू नयेत अशी विनंती केली होती.

बातम्या आणखी आहेत...