आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलीवुड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशल हे दोघे उद्या म्हणजे 9 डिसेंबर रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. 2003 साली बूम या चित्रपटातून कतरीनाने सिनेसृष्टीत पदार्पण केले. तर विक्की कौशलने साइड आर्टिस्ट म्हणून लव शव चिकन खुराना या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये एंट्री केली. सिनेसृष्टीत पदार्पणापासून ते आतापर्यंत या दोन्ही कलाकारात मोठा बदल झाला आहे. या जोडप्यात कसे बदल घडले ते फोटोंच्या माध्यमातून पाहूयात...
कतरीनाने इंग्लिश-हिंदी इरोटिक चित्रपट बूममधून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. त्यात अमिताभ बच्चन, गुलशन ग्रोवर, जॉकीज श्रॉफ हे कलाकार पाहायला मिळाले होते. या चित्रपटाविषयी कतरिना म्हणते की, 'मी बूम चित्रपटाला आपल्या करिअरमध्ये महत्त्वाचे मानत नाही. जेव्हा मी चित्रपट साइन केला तेव्हा मला भारत आणि तेथील प्रेक्षकांची कल्पना नव्हती.' असे कटरीनाचे म्हणणे आहे.
विक्की कौशलने अनुराग कश्यपच्या 2012 साली आलेल्या गँग्स ऑफ वासेपुर चित्रपटाला असिस्ट केल्यानंतर याच वर्षी त्याने लव शव ते चिकन खुराना या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात केली. या चित्रपटात विक्की कौशलने कुणाल कपुरचे बालपणीची भुमिका साकारली होती.
सलमान खानच्या मैंने प्यार क्यो किया या चित्रपटाच्या माध्यमातून कतरिना कैफला देशभरात एक नवी ओळख मिळाली. त्या चित्रपटात कतरिनाने मॉडेलची भूमिका साकारली होती, ज्यामध्ये तिची स्क्रीन प्रेझेन्स आणि क्युट लुक जनतेने खूपच पसंत केले.
2015 साली आलेल्या मसान या चित्रपटात विक्कीने लीड रोलची भुमिका साकारली होती. त्यात विक्कीने मध्यमवर्गीय मुलाचा रोल करताना पाहायला मिळाला. चित्रपटात विक्कीचा कुटुंब बनारसच्या घाटात मृतदेह जाळण्याचे काम करत असे. या नॉन ग्लॅमलूकमध्ये विकीचे खूप कौतुक करण्यात आले होते.
या चित्रपटांतून परिवर्तन
रमन राघव 2.0 यात विक्की कौशलचा इंटेन्स लूक पाहायला मिळाला. याशिवाय 'राझी' चित्रपटातील अभिनेत्याच्या सभ्य लूकचीही खूप प्रशंसा झाली. विकी कौशल 2019 च्या उरी: द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटानंतर राष्ट्रीय क्रश बनला होता.
तर कतरीनाने हमको दिवाना कर गये, नमस्ते लंडन, पार्टनर, वेलकम, रेस, सिंग इन किंग अशा प्रसिद्ध चित्रपटातून एक वेगळी ओळख जगात निर्माण केली आहे. 2009 साली आलेल्या अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटात कतरीना कॉमेडी करताना पाहायला मिळाली. या चित्रपटात प्रत्येकाचे लक्ष कटरीनाच्या चेहऱ्यावरील हावभावावर होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.