आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Katrina Kaif's Car Chase Sequence Was Shot In St. Petersburg, Sources Said The Actress's Running Was So Fast That The Camera Could Not Follow Her

टायगर 3:सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रीत झाला कतरिना कैफचा कार चेस सिक्वेन्स, या दृश्याच्या शूटिंगवेळी कतरिना इतक्या वेगाने पळाली की कॅमेरा तिचा पाठलाग करु शकला नाही - सूत्र

अमित कर्ण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुर्कीत अ‍ॅक्शन दृश्यांची शूटिंग करताहेत सलमान-कतरिना

कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे, बॉलिवूडचे अनेक मोठे बॅनर युरोपियन देशांमध्ये तळ ठोकून आहेत. एकीकडे अक्षय कुमार आपल्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे, तर दुसरीकडे डायना पेंटी आपल्या एका प्रोजेक्टसाठी बुडापेस्टमध्ये आहे. कंगनाने नुकतेच तेथे ‘धाकड’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. याशिवाय विकास बहल लंडनमध्ये टायगरच्या ‘गणपत’साठी सिल्वर सिटी उभारण्यात लागले आहेत. दुसरीकडे सलमान खान आणि कतरिना कैफ 'टायगर 3’चे रशिया शेड्यूल पूर्ण केल्यानंतर आता तुर्कीमध्ये आहेत. तेथे इस्तांबुलच्या दक्षिणेत ताराबयामध्ये याचे शूटिंग सुरू आहे. राणी मुखर्जीदेखील सध्या नॉर्वेमध्ये आपल्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. तिच्या चित्रपटाचा सेट उत्तरी युरोपाच्या अ‍ॅश्टोनियामध्ये उभारण्यात आला आहे. तसेच रशियाच्या दक्षिणेत सुपरस्टार अजितच्या नाव न ठरलेल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.

तुर्कीत अ‍ॅक्शन दृश्यांची शूटिंग करताहेत सलमान-कतरिना
तुर्कीचे शेड्यूल पूर्ण केल्यानंतर ‘टायगर 3’ची टीम ऑस्ट्रियाला वळणार. टीमने नुकतेच सेंट पीट्सबर्गमध्ये कतरिना आणि सलमानसोबत कारचा पाठलाग करण्याचे दृश्य चित्रित केले. सेटवरील सूत्रानुसार, या दृश्याच्या शूटिंगवेळी कतरिना इतक्या वेगाने पळाली की कॅमेरा तिचा पाठलाग करु शकला नाही. नंतर स्पीड एडजस्ट करुन तो शॉट पूर्ण केला. तुर्कीमध्ये खास करुन चित्रपटाचे अ‍ॅक्शन दृश्य चित्रीत केले जात आहेत. स्टंट कोऑर्डिनेटर म्हणून ‘द बॉर्न सुपरमेसी’ आणि ‘द इटॅलियन जॉब’ फेम विक्टोर इवानोव या चित्रपटाशी जोडलेले आहेत.

लेक बायकलवर शूट झाले ‘पठान’चे महत्त्वाचे दृश्य
याव्यतिरिक्त शाहरुख आणि दीपिका लवकरच स्पेनमध्ये ‘पठान’चे गाणे शूट करणार आहे. ‘पठान’च्या अ‍ॅक्शन दृश्यासाठी शाहरुखने ‘झिरो’च्या अ‍ॅक्शन डिझायनर सर्गेई गोलोवकिनला हायर केले आहे. लेक बायकलवर चित्रपटाच्या टेक्निकल टीमने काही महिन्याआधी बाइकच्या पाठलागाचे आणि बंदुकीचे दृश्य शूट केले गेले होते. तो चार ते पाच दिवसाचे शेड्यूल होते. काही तसेच दृश्य त्यांनी दुबईतही चित्रीत केले होते. मात्र भागात शाहरुख आणि दीपिका नव्हते.

बातम्या आणखी आहेत...