आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RRR:कतरिना कैफची बहीण इसाबेलने रिजेक्ट केली होती भूमिका, चित्रपटात ऑफर झाली होती ज्युनियर एनटीआरच्या प्रेयसीची भूमिका

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजामौली यांच्यासोबत काम करण्यास प्रत्येक अभिनेता असतो उत्सुक

एसएस राजामौली यांचा 'आरआरआर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफला या चित्रपटातील भूमिका ऑफर करण्यात आली होती, परंतु तिने ती करण्यास नकार दिला. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्याशिवाय या चित्रपटात अजय देवगण, आलिया भट्ट आणि ऑलिव्हिया यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

इसाबेलने मागितली होती चित्रपटाची स्क्रिप्ट
इसाबेल कैफला चित्रपटात ज्युनियर एनटीआरच्या प्रेयसीची भूमिका ऑफर झाली होती. परंतु इसाबेलने ती करण्यास नकार दिला. नंतर ही भूमिका ऑलिव्हियाने या चित्रपटात साकारली आहे.

रिपोर्ट्सनुसार, इसाबेलने चित्रपटाची स्क्रिप्ट आणि सर्व तपशील मागितला होता, परंतु तो दिला देण्यात आला नाही. म्हणून तिने भूमिका करण्यास नकार दिला.

'टाइम टू डान्स'मधून केले होते पदार्पण

इसाबेलने 2021 मध्ये 'टाइम टू डान्स' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात सूरज पांचोलीही मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकला नाही.

राजामौली यांच्यासोबत काम करण्यास प्रत्येक अभिनेता असतो उत्सुक
दरम्यान, ज्युनियर एनटीआरने एसएस राजामौली यांच्यासोबतच्या कामाच्या अनुभवाबद्दल बोलताना म्हटले, "त्यांच्यासोबत काम करणे खूप चांगला अनुभव आहे. त्यांच्या चित्रपटाचा भाग होणे हे खूप भाग्याचे आहे. एक अभिनेता म्हणून, मी म्हणेन की ते असे एक दिग्दर्शक आहेत, ज्यांच्यासोबत काम करण्यास प्रत्येक अभिनेता उत्सुक असतो."

'RRR'ने सर्व रेकॉर्ड तोडले
'RRR'ने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पहिल्या वीकेंडमध्ये म्हणजेच रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांत 500 कोटींहून अधिकचा वर्ल्डवाईड व्यवसाय करून चित्रपटाने इतिहास रचला आहे. 550 कोटींहून अधिकच्या बजेटमध्ये बनलेला 'RRR' तीन दिवसांत जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...