आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या अवतारात दिसणार कतरिना:बॉलिवूडच्या पहिल्या फीमेल सुपरहीरो चित्रपटात झळकणार कतरिना कैफ, चार देशांमध्ये होणार चित्रपटाचे चित्रीकरण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कतरिना सुपर वुमनच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. यावेळी अली अब्बास जफर सुपरहीरो थीमवर एक चित्रपट बनवणार आहेत. यात कतरिना सुपर वुमनच्या भूमिकेत दिसणार आहे. ती प्रथमच अशी भूमिका साकारणार आहे.

शूटिंग 4 देशांमध्ये केले जाईल

सूत्रांच्या माहितीनुसार, अली अब्बास हा चित्रपट मोठ्या स्तरावर करण्याची तयारी करत आहे. तीन ते चार देशांमध्ये याचे चित्रीकरण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सध्या ते दुबईमध्ये लोकेशन शोधत आहेत. मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, दुबई आणि अबू धाबीमधील अनेक लोकेशन फायनल केली गेली आहेत. लवकरच ते आणखी काही लोकेशनच्या शोधात पोलंड आणि जॉर्जियाला जाणार आहेत.

हा हिंदी सिनेसृष्टीतील पहिला फीमेल सुपरहीरोवर आधारित चित्रपट असेल, ज्याचे काही भारतीय लोकेशन्सवरही चित्रीकरण करण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्ली येथे या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाणार आहे, कारण काही दृश्यांमध्ये डोंगराळ भागात दाखवला जाईल.

अली यांनी सांगितल्यानुसार, कोविड -19 नंतर न्यू नॉर्मलमध्ये चित्रपटासाठी लोकेशन शोधणे सोपे नाही. लोकेशन निश्चित करण्यापूर्वी प्रत्येक ठिकाणी कोविड चाचणी केली जाते, त्यामुळे पुर्वीपेक्षा जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे बजेटवरही अतिरिक्त भार पडतो.

कतरिना स्टंट करताना दिसणार आहे
या चित्रपटात कतरिना बरेच स्टंट सीन्स करताना दिसणार आहे, त्यासाठी तिने प्रशिक्षण सुरू केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षापासून सुरु होईल. तोपर्यंत कतरिना 'फोन भूत' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करेल. या पात्रासाठी कतरिना लवकरच उर्वरित तयारी सुरू करणार आहे. लवकरच ती या चित्रपटाच्या तारखादेखील फायनल करणार आहे.

यापूर्वी कतरिनाने अब्बास यांच्या 'टायगर जिंदा है' आणि 'भारत' चित्रपटात काम केले आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते.